Rohit Pawar on Ajit Pawar : योद्धा कधी जखमांच्या वेदना उगाळत बसत नाही; मिशा काढण्यासाठी काही लोकांनी हाती वस्तरा घेऊन तयार रहावं; रोहित पवारांचा अजितदादांवर हल्लाबोल
बारामतीमध्ये प्रचार सांगता सभेत रोहित पवार यांना अश्रू अनावर झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या प्रचार सांगता सभेत नक्कल केली होती. यानंतर आता रोहित पवार यांनी सडकून टीका केली आहे.
Rohit Pawar on Ajit Pawar : बारामती लोकसभेवरून अजित पवार गट आणि शरद पवार गटात चुरशीचा सामना सुरु आहे. बारामतीमध्ये निकराची लढाई होत असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमदार रोहित पवार यांनी जाहीर आव्हान दिलं आहे. बारामतीमध्ये प्रचार सांगता सभेत रोहित पवार यांना अश्रू अनावर झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या प्रचार सांगता सभेत नक्कल केली होती. यानंतर आता रोहित पवार यांनी अजित पवार यांना पुन्हा आव्हान देत वस्तरा घेऊन मिशा काढण्यासाठी तयार रहावे असे म्हटले आहे.
शरद पवारांचे 8 मेपासून कार्यक्रम सुरु
बारामतीमधील शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सांगता सभेत बोलताना शरद पवार पकृती ठिक नसल्याचे दिसून आले होते. सलग घेतलेल्या सभांनी शरद पवारांचा घसा बसला होता. अशा स्थितीमध्येही त्यांनी सभेला संबोधित केले होते. शरद पवार यांचं भाषण संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळे आजचे (6 मे) कार्यक्रमर रद्द करण्यात आले होते. आता पुन्हा 8 मेपासून कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत. रोहित पवार यांनी ट्विट करत शरद पवारांच्या दौऱ्याची माहिती दिली आहे.
ज्यांनी कॅन्सरलाही पराभूत केलं, भाजपसारख्या महाशक्तीलाही पाणी पाजलं, सत्तेच्या दबावाला सत्याच्या ताकदीवर झुकवलं तो आहे महाराष्ट्राचा सह्याद्री…. अजिंक्य योद्धा आदरणीय पवार साहेब!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 6, 2024
अनेकजण एकाच मतदारसंघात अडकून पडले पण या योद्ध्याने गेल्या २२ दिवसात तब्बल ५२ सभा घेऊन भाजप… pic.twitter.com/VHuSF54Hm0
काही लोकांनी हाती वस्तरा घेऊन तयार रहावं
रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ज्यांनी कॅन्सरलाही पराभूत केलं, भाजपसारख्या महाशक्तीलाही पाणी पाजलं, सत्तेच्या दबावाला सत्याच्या ताकदीवर झुकवलं तो आहे महाराष्ट्राचा सह्याद्री, अजिंक्य योद्धा आदरणीय पवार साहेब!अनेकजण एकाच मतदारसंघात अडकून पडले पण या योद्ध्याने गेल्या 22 दिवसात तब्बल 52 सभा घेऊन भाजप सरकारविरोधात रान उठवलं आणि कालपासून तब्येत बरी नसताना आणि डॉक्टरांनी दौऱ्याला विरोध केला असतानाही हा योद्धा केवळ 1 दिवसाची क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा मैदानात निघालाय, हाती विचारांचं हत्यार घेऊन. म्हणतात ना, योद्धा कधी जखमांच्या वेदना उगाळत बसत नाही. काही लोकांनी हाती वस्तरा घेऊन तयार रहावं. मिशा काढण्यासाठी.
इतर महत्वाच्या बातम्या