एक्स्प्लोर
Advertisement
स्वत: गटारीत उतरुन सफाई करणारा शिवसेना नगरसेवक!
गुरुशांत धुत्तरगावकर हे जनमानसात चांगली प्रतिमा असलेला तरुण नगरसेवक आहे. त्यांनी 26 एप्रिलपासून लोकसहभागातून सफाई मोहीम सुरु केली. यासाठी त्यांनी स्वखर्चातून 20 फावडे, कुदळ आणि टोपल्या घेतल्या आहेत.
सोलापूर: नगरसेवक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आलिशान गाडीत फिरणारा, महागडे कपडे घालणारा, गळ्यात, हातात सोन्याचे दागिने असलेला व्यक्ती उभा राहतो.
पण या सगळ्यांना छेद देणारा एक नगरसेवक सोलापुरात आहे. शिवसेनेचा हा तरुण नगरसेवक स्वतः गटारीत उतरुन नाला साफ करतो. गुरुशांत धुत्तरगावकर असं त्यांचं नाव आहे.
जनतेमध्ये लोकप्रिय असलेला हा सामाजिक कार्यकर्ता नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत लोकवर्गणीतून निवडून आला आहे. आता लोकसहभागातून प्रभागाच्या विकासासाठी झटतोय.
गुरुशांत धुत्तरगावकर हे जनमानसात चांगली प्रतिमा असलेला तरुण नगरसेवक आहे. त्यांनी 26 एप्रिलपासून लोकसहभागातून सफाई मोहीम सुरु केली. यासाठी त्यांनी स्वखर्चातून 20 फावडे, कुदळ आणि टोपल्या घेतल्या आहेत.
प्रत्येक बुधवारी सकाळी 8 ते 10 या वेळेत सफाई मोहिम राबवली जाते. गुरुशांत धुत्तरगावकर यांनी 'आधी केले मग सांगितले' या तत्वानुसार पूर्ण दोन तास स्वतः श्रमदान केलं. या उपक्रमात लोकांचा सहभाग वाढत चालल्याने मोहिमेला व्यापक स्वरुप प्राप्त होत आहे.
मनपा कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचा त्यांचा मानस आहे. लोकसहभागातून राष्ट्रनिर्माण हे त्यांचं ध्येय आहे.
गुरुशांत धुत्तरगावकर यांनी यापूर्वी रक्तदान शिबिरापासून किल्ले सफाईपर्यंत अनेक सामाजिक कार्य केली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement