एक्स्प्लोर

Solapur : अवैध दारुविक्रीवर कारवाई करणाऱ्या वेळापूर पोलिसांवर हल्ला, दोघा आरोपींना अटक

वेळापूर पोलिसांवर हल्ला प्रकरणी पाच आरोपींपैकी दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर अकलूज येथे उपचार सुरु आहेत.

सोलापूर : वेळापूर येथील अवैध दारु विक्रीवर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्याऱ्या चार आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. बाकी दोघांचा शोध घेण्यासाठी या भागात जोरदार कोम्बिंग ऑपरेशन सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे बेकायदा दारु विक्रीवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला काठीने बेदम मारहाण करण्याचा प्रकार काल रात्री घडला होता. यामध्ये वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे, पोलीस कर्मचारी विठ्ठल बंदुके हे गंभीर जखमी झाले असून पोलीस नाईक महेरकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनीसार, काल रात्री वेळापूर जवळ असलेल्या एका ठिकाणी बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती वेळापूर पोलिसांना मिळताच येथे छापा टाकण्यासाठी पोलीस पथक गेले . मात्र पोलीस गाडीतून उतरताच एका गुन्हेगाराने लाकडी दांडक्याने पोलिसांवर हल्ला केला. यात पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांच्या डोक्याला मोठी जखम झाल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न करीत असताना या आरोपीने पोलीस निरीक्षकांना गाडीत ठेवत असणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवरही जोरदार हल्ला केला. जखमी पोलिसांनी तातडीने गाडी दवाखान्याकडे हलवली. या हल्ल्याच्या वेळी एक आरोपी मारहाण करीत होता तर इतर चौघे त्याच्या मदतीला उपस्थित असल्याची माहिती दिली जात आहे. 

या घटनेनंतर सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जोरदार कोम्बिंग ऑपरेशन सुरु करण्याचे आदेश दिले. दरम्यान या हल्ल्यातील मुख्य आरोपी फरार असून इतर चौघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांवर या हल्ल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारांना आता पोलिसांची भीती उरली नसल्याचे दिसत आहे. जखमी पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत .

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget