एक्स्प्लोर
सोलापुरात मश्रुम गणपती मंदिराचा 25 तोळे सोन्याचा कळस चोरीला
सोलापूर : सोलापुरात हिप्परगामधील मशरुम गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेल्याची धक्कादायक गोष्ट उघडकीस आली आहे. तब्बल 25 तोळे सोन्याचा कळस चोरट्यांनी लांबवला आहे.
बुधवारी रात्रभर सोलापूर भागात मुसळधार पाऊस पडत होता. त्याचवेळी वीजपुरवठाही खंडीत झाला होता. याचाच फायदा चोरट्यांनी उचलून कळस लांबवल्याचं बोललं जातंय.
सकाळी पुजारी आल्यानंतर प्रसिद्ध गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेल्याचं लक्षात आलं. भाविकांच्या योगदानातून हा मिश्र धातूंचा कळस बांधला होता, त्याला 25 तोळे सोन्याचा मुलामा होता.
स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement