एक्स्प्लोर
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची महिला पदाधिकाऱ्याशी अश्लील भाषा, संभाषण व्हायरल
सोलापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा दावा करणाऱ्या दीपक साळुंखे यांनी महिला पदाधिकाऱ्याविषयी अत्यंत घाणेरड्या शब्दांचा वापर केल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूरच्या जिल्हाध्यक्षाने महिला पदाधिकाऱ्यांशी केलेली अश्लील शिवीगाळ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी निवडीतील असंतोष एका अक्कलकोटच्या कार्यकर्त्याने जिल्ह्याध्यक्ष दीपक साळुंखे यांना फोनवरून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी साळुंखे यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी अत्यंत अश्लील आणि अर्वाच्य भाषेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा उद्धार केला.
फोन करणाऱ्या पदाधिकाऱ्याने साळुंखेंना समजावण्याचा प्रयत्न सुरु ठेवत असताना साळुंखे यांची गाडी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मोहिते पाटील यांच्यावर घसरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्यासोबत आहेत तोपर्यंत राज्यात आपले कुणीही $%*& करू शकत नसल्याची मस्तवाल भाषा साळुंखे यांनी वापरली.
दीपक साळुंखे हे सोलापूर विधानपरिषदेचे माजी आमदार असून अजित पवार यांच्या अतिप्रेमातील नेते म्हणून दबदबा असल्याने त्यांना राष्ट्रवादीचे पद मिळाले आहे. नुकतेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बदलात अनेक ठिकाणी असंतोष दिसून आला. अक्कलकोटच्या एका पदाधिकाऱ्याने साळुंखे यांना यासंदर्भातच फोन केला होता. सध्या साळुंखे यांनी माढा लोकसभेसाठी आपला दावा जाहीर केला आहे. क्लिप व्हायरल झाल्यावर साळुंखे यांनी हा आपला आवाज नसल्याचा कांगावा सुरु केला असून कोर्टात जाण्याची भाषा सुरु केली आहे.
फोनवरील नेमका संवाद काय आहे?
कार्यकर्ता - हॅलो आबासाहेब, मला --- या महिला पदाधिकाऱ्याचा सारखा फोन येऊ लागलाय.. पक्षाच्या निवडीचं काय झालं असं विचारत आहेत.. चुकीच्या निवडी झाल्या तर आम्ही राजीनामा देणार आहे..
दीपक आबा - आबा असल्या भुरट्या कार्यकर्त्यांना घाबरत नाही.. असली भीती घालू नका कुठल्या माकडाची आणि बाईची मला भीती घालू नका ... कोणाला द्यायचं असेल राजीनामा तर द्या ... मोहिते पाटलाचे चमचे आहेत .... वागविणारा .. पक्षांची पावती... फाडली नाही.. त्या ‘बाई’ला **** आला असेल तर दे म्हणावं राजीनामा, **** . “शरद पवार आहेत तो पर्यत माझं जिल्ह्यातच काय राज्यात सुद्धा कोणी ... वाकडं करू शकत नाहीत. मोहिते पाटलांचे चमचे, **** लोकांनी आपल्याला पक्ष निष्ठा शिकवू नये”…
अशा प्रकारचे बेताल आणि शिवराळ संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. त्यामुळे पक्षाच्या महिला आणि इतर पदाधिकाऱ्यांबाबत अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या साळुंखे पाटलावर पक्षांचे ज्येष्ठ नेते काय कारवाई करतात, की त्यांना पाठीशी घालतात याकडे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement