एक्स्प्लोर
ना मोक्ष, ना पिंडाला कावळा; विज्ञानवादी कार्यकर्त्याचा मृत्यूनंतरही सामाजिक संदेश
तुळसीदास किल्लेदार हे विज्ञानवादी विचारांचे प्रसारक होते. वनस्पतीशास्त्रात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षण घेतले होते. त्यांनी आपल्या शेतीत सेंद्रीय पद्धतीने अनेक प्रयोग करुन शेतकऱ्यांच्यात जागृती केली होती.
कोल्हापूर : विद्यार्थी चळवळीपासून सामाजिक कार्याला सुरुवात केलेले भारत ज्ञान विज्ञान समुदायचे महाराष्ट्राचे सचिव आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते तुळसीदास किल्लेदार यांचं 5 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम कोणतेही धार्मिक विधी न करता आज लिंगनूरमधील स्मशानभूमीत पार पडला. यावेळी कागल तालुक्यासह जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येने लोक हजर होते.
रक्षा विसर्जनाचा विधी म्हटले की, आपल्यासमोर पिंड, नैवद्य यांच्यासह काही धार्मिक गोष्टी केल्या जातात. पिंडाला कावळा शिवला पाहिजे, त्याशिवाय आत्मा मोक्षाला जात नाही, असा सर्वसामान्य समज लोकांमध्ये असतो. त्याबरोबरच, रक्षा वाहत्या पाण्यात सोडली जाते. या प्रथेला बगल देत तुळसीदास किल्लेदार यांच्या कुटुंबियांनी रक्षा विसर्जनाने पाण्यात प्रदूषण होऊ नये, यासाठी शेतात केले आणि एक नवा आदर्श घालून दिला. आज रक्षा विसर्जन कार्यक्रमाला हजर असलेल्या शेकडो लकांसाठी हे दिशादर्शक होतं.
तुळसीदास किल्लेदार हे विज्ञानवादी विचारांचे प्रसारक होते. वनस्पतीशास्त्रात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षण घेतले होते. त्यांनी आपल्या शेतीत सेंद्रीय पद्धतीने अनेक प्रयोग करुन शेतकऱ्यांमध्ये जागृती केली होती.
शेतकरी आंदोलनात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. साक्षरता अभियान, विज्ञानाचा प्रचार, अंधश्रद्धेच्या विरोधातील आंदोलने, पर्यावरणाचा अभ्यास आणि कृतीशील आंदोलने अशा अनेक लढ्यात तुळसीदास किल्लेदार यांचा सहभाग होता.
तुळसीदास यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीतील अतिशय महत्त्वाचा कार्यकर्ता हरपला आहे. तुळसीदास किल्लेदार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता लिंगूनर येथील मराठी शाळेत करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement