Corona Test | राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड-19 तपासणी केंद्रांची मान्यता
राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. बीड, जळगाव, बारामती, नांदेड, गोंदिया, कोल्हापूर याठिकाणी हे टेस्टिंग सेंटर्स असणार आहेत.
मुंबई : कोविड-19 चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय, खाजगी त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविड-19 तपासणी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी घेतला होता. त्यानुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांचे प्रस्ताव तातडीने पाठवण्याबाबत कळवण्यात आलं होतं.
प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात अशी तपासणी केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या चाचणी केंद्रासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री, साधन सामग्री तसेच अन्य बाबी संबधित जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात आलेल्या समितीच्या मान्यतेने व शिफारशीनुसार करण्यात याव्यात, असे आदेशही देण्यात आले आहेत.
कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी?
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.
- स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई, जि. बीड.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,बारामती, जि. पुणे.
- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,गोंदिया.
- देशातील 29 टक्के कोरोना बाधित दिल्लीतील निझामुद्दीन मर्कजशी संबंधित : आरोग्य मंत्रालय
- Lockdown | देशात 3 मे नंतरच्या ठराविक डोमेस्टिक फ्लाईटसाठी एअर इंडियाचं बुकिंग सुरू
- 'आमची टेस्ट करा पण आम्हाला मुंबईत येऊ द्या', समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची व्यथा