Nagpur : उपराजधानीत महिन्याभरात स्वाईनफ्लूचे सहा रुग्ण, एकाचा मृत्यू
NMC : या वर्षात 11 ते 27 जानेवारीदरम्यान मनपा हद्दीतील सहा स्वाइन फ्लू रुग्णांची नोंद झाली. यातील एका रुग्णांचा मृत्यू झाला. तर पाचही रुग्ण स्वाइन फ्लू मुक्त झाल्याची माहिती डॉ. नवखरे यांनी दिली.

Swine Flu cases in Nagpur : कोरोनाची आता भीती नसली तरी स्वाइन फ्लूचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. नव्या वर्षांत नागपूर शहरात स्वाइन फ्लूचे सहा रुग्ण आणि एक मृत्यूची नोंद झाली. तर मागील वर्षी शहर आणि ग्रामीण मिळून 489 रुग्ण व 30 रुग्णांचा जीव गेला. यामुळे स्वाइन फ्लू टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
स्वाइन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीद्वारे नागपूर शहरातील स्वाइन फ्लू स्थितीचा आढावा घेण्यात आला. समितीसमोर एका स्वाइन फ्लू संशयित रुग्णाच्या मृत्यूविषयी माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता हा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. मृत व्यक्ती 72 वर्षांची होती. त्याला अनेक सहव्याधी असल्याचे पुढे आले. बैठकीला समितीचे अध्यक्ष व मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, मेयोचे डॉ. प्रवीण सलामे, डॉ. रवींद्र खडसे, डॉ. मिलिंद सूर्यवंशी, डागा हॉस्पिटलच्या डॉ. माधुरी थोरात, नागपूर महानगरपालिकेचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे आदी उपस्थित होते.
पाचही रुग्ण स्वाइन फ्लूमुक्त
11 ते 27 जानेवारीदरम्यान मनपा हद्दीतील सहा स्वाइन फ्लू रुग्णांची नोंद झाली. यातील एका रुग्णांचा मृत्यू झाला. तर पाचही रुग्ण स्वाइन फ्लू मुक्त झाल्याची माहिती डॉ. नवखरे यांनी दिली.
तब्बल 678 रुग्ण, 62 मृत्यू
2022 मध्ये शहरात 371 रुग्ण व 21 मृत्यू झाले. ग्रामीणमध्ये 118 रुग्ण व 9 मृत्यू तर इतर जिल्हा व इतर राज्यातून नागपुरात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या 189 व 32 मृत्यूची नोंद होती, असे एकूण 678 रुग्ण व 62 मृत्यू झाले. ही संख्या चिता वाढविणारी असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
सप्टेंबरमध्ये वाढली होती रुग्णसंख्या
नागपुरात दरवर्षी हिवताप, डेंगी (Dengue), गॅस्ट्रो (Gastro) हे संसर्ग आजार डोके वर काढतात. मागील दोन वर्षे कोरोनाची (Covid 19) महामारी अनुभवली. सप्टेंबर महिन्यात कोरोना अटोक्यात येण्याची चिन्हे असली तरी स्वाईन फ्लू (Swine Flu)ने ऐन सणाच्या हंगामात डोके वर काढले होते. नागपूर जिल्ह्यात जुलै 2022 पासून स्वाइन फ्लूचे संकट चांगलेच घोंघावत होते. अहवालानुसार जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत 455 बाधित आढळून आले होते. यातील 241 बाधित म्हणजेच तब्बल 53 टक्के रुग्ण शहरातील होते.
ही बातमी देखील वाचा...
























