एक्स्प्लोर
सिंदखेड राजा नगरपालिकेवर युतीची सत्ता तर लोणार पुन्हा काँग्रेसच्या हाती
बुलडाना जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि लोणार नगरपालिकेचा निकाल लागला आहे. सिंदखेड राजा नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे सतीश तायडे निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देविदास ठाकरे यांचा दीड हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.

बुलडाना : बुलडाना जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि लोणार नगरपालिकेचा निकाल जाहीर झाला आहे. सिंदखेड राजा नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे सतीश तायडे निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देविदास ठाकरे यांचा दीड हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. सिंदखेड राजा नगरपालिकेवर शिवसेनेचे सात, राष्ट्रवादीचे आठ, अपक्ष एक तर एक ठिकाणी भाजपचा नगरसेवक विजयी झाला आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा नगरपालिकेची निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक जास्त जागा आली तरी शिवसेनाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला आहे. सिंदखेड राजा विधानसभेचे माजी आमदार आणि माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि सिंदखेड राजा विधानसभेचे विद्यमान आमदार शशिकांत खेडेकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र यामध्ये डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव केला आहे. त्यामुळे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. लोणार नगरपालिका लोणार नगरपालिका सत्ता पलटण्याचा पायंडा यावेळेस मतदारांनी मोडीत काढला. लोणार नगरपालिकेच्या स्थापनेपासून लोणार शहरातील जनतेनं कोणत्याच पक्षाला सलग दोनदा सत्ता दिली नव्हती. मात्र यावेळी लोणारवासियांनी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकहाती सत्ता दिली आहे. लोणार नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे आज निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार सौ. पुनम मनिष पाटोळे ह्या बहुमतांनी विजयी झाल्या. तसेच 17 जागांपैकी काँग्रेस पक्षाचे 10 आणि शिवसेनेचे सात उमेदवार विजयी झाले.
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















