एक्स्प्लोर

Sindhudurg : संपूर्ण गावचं गेलं सुट्टीवर, 600 वर्षांची आगळीवेगळी परंपरा; चिंदर ग्रामस्थ गुराढोरांसह वेशीबाहेर

Sindhudurg Chindar village Gavpalan : तळकोकणातील चिंदर गाव 600 वर्षांपासून आगळीवेगळी परंपरा पाळतं. चिंदर गाव तीन दिवसांच्या सुट्टीवर गेलं असून सर्व ग्रामस्थ गुराढोरांसह वेशीबाहेर गेले आहेत.

Sindhudurg Chindar village Gavpalan : कोकणातील एक अनोखी आणि आगळी वेगळी परंपरा म्हणजे 'गावपळण'. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर गावात ही परंपरा सुरू आहे. रवळनाथाच्या कौलाने दर तीन वर्षांनी मोठ्या उत्साहात चिंदर गावची गावपळण ही परंपरा सुरू होते. चिंदर गावात गावपळणीला दुपारनंतर सुरुवात होते. गावकरी गुराढोरांसह तीन दिवस वेशीबाहेर निघाले. तीन दिवसांनी देवाचा कौल घेऊन पुन्हा सर्वांचा गावात प्रवेश होणार आहे.

आगळ्यावेगळ्या गावपळण परंपरेसाठी चिंदर गाव आजच्या विज्ञान युगातही गावपळण परंपरा पाळत गावाबाहेर जातं. कुणी खासगी वाहनांसह एसटी, रिक्षा, टेम्पोचा आधार घेत तर कोणी बैलगाडीतून पारंपरिक पद्धतीने गावाबाहेर जातात. दर तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमून रवळनाथाला तांदळाचा कौल प्रसाद घेतला जातो. त्यानंतर गावपळणीला सुरुवात होते.

'चिंदर गावची गावपळण करण्यास रवळनाथाची परवानगी आसा काय?', असं सांगणं करून उजवा कौल प्रसाद झाल्यावर बारा पाच मानकरी एकत्र (मेळ्यावर) बसून भटजींना विचारुन तारीख ठरवतात. त्यानंतर गावच्या देवाला कौल लावला जातो. देवाने कौल दिला की गावकरी गाव सोडून वेशीबाहेर राहुट्या उभारून राहतात. तीन दिवस तीन रात्री भजन, फुगड्या खेळत मजेत आनंदाने घालवतात.
Sindhudurg : संपूर्ण गावचं गेलं सुट्टीवर, 600 वर्षांची आगळीवेगळी परंपरा; चिंदर ग्रामस्थ गुराढोरांसह वेशीबाहेर

600 वर्षाची ही गावपळण परंपरेनिमित्त देवाच्या कौलाने चिंदर गाव सुट्टीवर गेलं आहे. या गावात पाच ते सात  हजार लोकसंख्या आहे. सर्व धर्मीय या परंपरेला मानून गावपळण प्रथेमुळे सुट्टीवर आहे. गावकरी मोठ्या उत्साहाने पूर्ण गाव खाली करत रानावनात वेशीवर झोपड्यांमध्ये राहतात. गावपळणीला काहीजण श्रद्धा तर काहीजण अंधश्रद्धा म्हणून पाहतात. मात्र चिंदर वासीय गावपळण म्हणजे गावाच्या ग्रामदेवताने दिलेला एक कौल म्हणून मानतात.
Sindhudurg : संपूर्ण गावचं गेलं सुट्टीवर, 600 वर्षांची आगळीवेगळी परंपरा; चिंदर ग्रामस्थ गुराढोरांसह वेशीबाहेर

या गावपळणीला चाकरमानी सुद्धा विशेष करून हजेरी लावतात. तर काही मुंबईवासीय सुद्धा याचा अनुभव घेण्यासाठी गावाच्या वेशीवर येऊन गावपळणीचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. या गावपळणीच्या निमित्ताने गावातील महिला एकत्रित येत तीन रात्री फुगड्या, संगीत खुर्चीचा खेळ तर पुरुष मंडळी भजन-कीर्तन असे वेगळे कार्यक्रम घेत मनोरंजन करत रात्रं जागवतात. 

महाराष्ट्राला उत्सव आणि परंपरांचा मोठा वारसा लाभलेला आहे. मात्र आजच्या आधुनिकतेच्या युगात श्रद्धेला अंधश्रद्धेचे ग्रहण लागू न देण्याची खबरदारी घेतल्यास परंपरा टिकवण आणि त्यांचा आनंद घेण निरंतर शक्य होईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget