एक्स्प्लोर
सोलापुरातील सिद्धरामेश्वरांच्या लग्नसोहळ्याला भाविकांची मांदियाळी
सोलापुरात आज मोठ्या भक्तिमय वातावरणात चक्क देवाचा लग्न सोहळा पार पडला. कन्नड आणि संस्कृत भाषेतील मंगलाष्टका पठण झाल्यावर, लाखो भाविकांनी अक्षतांचा वर्षाव करत हा लग्न सोहळा संपन्न केला.
सोलापूर : सोलापुरात आज मोठ्या भक्तिमय वातावरणात चक्क देवाचा लग्न सोहळा पार पडला. कन्नड आणि संस्कृत भाषेतील मंगलाष्टका पठण झाल्यावर, लाखो भाविकांनी अक्षतांचा वर्षाव करत हा लग्न सोहळा संपन्न केला. या लग्नसोहळ्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थिती लावली.
शिवयोगी सिद्धारामेश्वरांनी आपल्या अवतार काळात लोकोद्धाराची अनेक कामे केली. त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष आचरण्यात आणण्यासाठी दरवर्षी सोलापुरात यात्रेचं आयोजन केलं जातं. या यात्रेच्या निमित्ताने गंगापूजा, सुगडी पूजा, समती वाचन आणि प्रतिकात्मक विवाह असे एक ना अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
आज संमती कट्यावर सिद्धरामेश्वरांच्या प्रतिकात्मक विवाह सोहळा झाला. या सोहळ्यात मानाचे सात नंदिध्वज आणि त्यासोबत चालणारे हजारो बाराबंदीधारक यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भक्तांनी मोठी गर्दी होती. आंध्र आणि कर्नाटकातील लाखो भाविक या प्रमुख सोहळ्याला उपस्थित होते. विशेष म्हणजे, मुस्लीम समाजही या भक्तीसागरात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
पाच दिवसांच्या या महायात्रेतला सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे अक्षता सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. उद्या होमहवन, परवा शोभेच दारूकाम आणि त्यांनतर नंदिध्वजांच वस्त्र विसर्जन होऊन यात्रेतल्या धार्मिक विधींची सांगता होते.
होम मैदानावर मात्र जानेवारी महिना अखेरपर्यंत गड्याची जत्रा भरते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement