एक्स्प्लोर
Advertisement
छिंदमच्या वक्तव्याचं प्रायश्चित, भाजपची उपमहापौर निवडणुकीतून माघार
सोमवारी 5 मार्चला उपमहापौर निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीत भाजप उमेदवार उभा करणार नाही.
अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेत भाजपने उपमहापौरपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचं प्रायश्चित म्हणून, भाजपने हे पाऊल उचललं.
सोमवारी 5 मार्चला उपमहापौर निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीत भाजप उमेदवार उभा करणार नाही. इतकंच नाही तर भाजप या मतदान प्रक्रियेपासून अलिप्त राहणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री राम शिंदे आणि नगर शहर, जिल्हा पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला.
दुसरीकडे उपमहापौर पदासाठी शिवसेना तयारीला लागली आहे. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी शिवसेना नगरसेवकांशी याबाबत चर्चा सुरु केली आहे.
श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपद रद्दचा ठराव मंजूर
दरम्यान, नगर मनपात 26 फेब्रुवारीला भाजपच्या बडतर्फ उपमहापौर श्रीपद छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला.
काय आहे प्रकरण?
श्रीपाद छिंदमने एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका सुरु झाली. 16 फेब्रुवारीला श्रीपाद छिंदम याला पोलिसांनी अटक केली होती.
संबंधित बातम्या :
उपमहापौर छिंदमचा राजीनामा मंजूर, नगरसेवक पदही रद्द करण्याची मागणी
छिंदमचं वकीलपत्र स्वीकारल्याची अफवा, वकिलाला नाहक मनस्ताप
नगर पोलिसांचा चकवा, छिंदमला येरवाड्याला सांगून नाशिक जेलमध्ये नेले!
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, माफी मागतो, प्रायश्चित्तास तयार : छिंदम
शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्याला महाराष्ट्रातून हद्दपार करा : संभाजीराजे
श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत
नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement