एक्स्प्लोर
विदर्भवादी नेते श्रीहरी अणेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा

नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्यासाठी लढा उभारणाऱ्या श्रीहरी अणे यांनी राजकीय पक्ष स्थापनेचा निर्णय घेतला आहे. विदर्भ राज्य आघाडी असं या पक्षाचं नाव असेल. श्रीहरी अणे त्यांच्या विदर्भ राज्य आघाडीला आगामी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीपासून राजकीय मैदानात उतरणार आहेत. "काँग्रेस आणि भाजप आमचे शत्रू आहेत आणि त्यांच्यासाठी आमची दारं नेहमी बंद असतील. पण विदर्भ समर्थक इतर राजकीय पक्ष आणि संघटनांशी आघाडी होऊ शकते," असं श्रीहरी अणे यांनी स्पष्ट केलं आहे. नागपूरमध्ये आयोजित विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्रीहरी अणे यांनी त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























