एक्स्प्लोर
Advertisement
'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नाही'
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी निक्षून सांगितल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना खासदारांनी सिंह यांची भेट घेतली आणि त्यांना आपलं मागण्याचं निवदेन सादर केलं होतं.
मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी निक्षून सांगितल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना खासदारांनी सिंह यांची भेट घेतली आणि त्यांना आपलं मागण्याचं निवदेन सादर केलं होतं.
मात्र, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, तर अन्य 30 भाषांनाही तो द्यावा लागेल. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही, असं राजनाथ सिंह यांनी सांगितल्याचं शिवसेना नेत्यांनी म्हटलं आहे.
याबाबत शिवसेना खासदार अरविंद सावंत एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले की, "अधिवेशनाच्या काळात आम्ही राजनाथ सिंहांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. यावेळी माझ्यासोबत शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित होते. पण त्यावेळी ही भेट होऊ शकली नाही. त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहुल शेवाळे आणि श्रीरंग बारणेंसह मी राजनाथ सिंहांची भेट घेतली. या भेटीत त्यांना आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात विनंती केली."
"शिवाय, 27 तारखेला मराठी भाषा दिन आहे. तसेच गुजरातमध्ये मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ते लवकरात लवकर करावं. अशी विनंतीही आम्ही त्यावेळी राजनाथ सिंह यांना केली."
"त्यावर राजनाथ सिंह पटकन म्हणाले की, इतर भाषांची तशी मागणी नाही. त्यावेळी तिथं राजीव प्रताप रुढीही होते. ते म्हणाले की, भोजपूरी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी आहे."
"पण भोजपुरी ही बोली भाषा आहे. त्यामुळे त्याची तुलना मराठीशी कशी होईल, हे आम्ही त्यांना सांगितलं. शिवाय, यासंदर्भात आम्ही यासाठी पंतप्रधानांनाही पत्र लिहिलं आहे. त्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून पोहोच देखील मिळाली आहे, हे सर्व आम्ही राजनाथ सिंह यांच्या निदर्शनास आणून दिलं. पण त्यानंतरही त्यांनी असमर्थता दर्शवली," असं त्यांनी यावेळी सांगितलं.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची सविस्तर प्रतिक्रिया पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement