एक्स्प्लोर

Sanjay Raut : आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, संजय राऊतांचं स्पष्टीकरण

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. शिवसेना दोन जागा लढवणार असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

Sanjay Raut on Rajya Sabha Election : राज्यसभेची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chhatrapati ) 42 मतांची तजवीज केली का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांनी केला आहे. आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. शिवसेना दोन जागा लढवणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमचा संभाजीराजेंना विरोध नसल्याचेही राऊत म्हणाले. मला बाकी काही माहिती नाही पण शिवसेनेच्या दोन जागा निवडून येणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेनेचे दोन उमेदवार राज्यसभेत जाणार असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत

शिवसेना अनेक वर्षापासून राजकारणात आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सध्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यातील दोन जागा शिवसेना लढवत आहे. या दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ आणि दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आणू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ज्याअर्थी एकादा उमेदवार मी लढणार असे जाहीर करतो, तेव्हा त्यांनी निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांची बेरीज केलेली असते. निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज लागते. त्या मतांची जमवाजमव संभाजीराजेंनी केली असेल असेही राऊत यावेळी म्हणाले. त्यांना कोणीतरी पाठिंबा देत असणार असेही ते म्हणाले.

राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार वाढवणे गरजेचं

आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे. अपक्ष नाही, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही मग ते कोणीही असो असे राऊत यावेळी म्हणाले. आम्ही संभाजीराजेंना सांगितले की तुम्ही शिवसेनेत या आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा. कारण राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार वाढवणे आम्हाला गरजेचे असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. तुम्ही एक पाऊल पुढे या आम्ही दोन पावले मागं जातो, तुम्ही छत्रपती आहात असेही राऊत यावेळी म्हणाले. आता निर्णय त्यांचा आहे. पण कोणत्याही परिस्थितीत दोन उमेदवार शिवसेनेचेच निवडून जातील असे राऊत म्हणाले. ये मेरे मन की बात नही ये उद्धवजी यांची मन की बात असल्याचे संजय राऊत म्हणाले. संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, कारण या आमच्या जागा आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले.
 
महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaBaramati Vastav 102 : Ajit Pawar vs Yugendra Pawar? बारामतीच्या आठवडी बाजारात कुणाची चर्चा ?100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget