रक्तरंजित निवडणूकाच्या कामाला राणेंनी सुरुवात केली, विनायक राऊत यांचं टीकास्त्र
Vinayak Raut : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तरंजित निवडणूकाच्या कामाला भाजप खासदार नारायण राणे यांनी सुरुवात केल्याची टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली.
Vinayak Raut : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तरंजित निवडणूकाच्या कामाला भाजप खासदार नारायण राणे यांनी सुरुवात केल्याची टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड- जामसंडे नगर पंचायतच्या शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेत विनायक राऊत बोलत होते. जमिनीचा मोबदला घेण्यासाठी आसुसलेले प्रमोद जठार यांच्या दहा पिढ्या गेल्या तरी नाणारला रिफायनरी होऊ देणार नाही, असेही विनायक राऊत यांनी यावेळी सांगितलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड- जामसंडे नगर पंचायतच्या शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील नाणार रिफायनरी संदर्भात भाष्य केलं आहे. या नाणार रिफायनरीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील तीन गावांचे भूसंपादन केलं जाणार होत. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांनी देवगड जामसंडे नगरपंचायत प्रचार सभेच्या व्यासपीठावरून नाणार रिफायनरी कोणत्याही परिस्थितीत होणार नसल्याचे स्पष्ट केलं. यावेळी भाजपचे नेते प्रमोद जठार यांच्यावरही टीका केली आहे. प्रमोद जठाराना झोप लागत नसेल, जोपर्यंत रिफायनरी हा शब्द डोक्यातून जात नाही, तोपर्यत प्रमोद जठाराना झोप येणार नाही. रिफायनरीच्या नावाखाली जी जमीन हडप केली. त्या जमिनीचा मोबदला घेण्यासाठी आसुसलेले प्रमोद जठार यांच्या १० पिढ्या गेल्या तरी नाणारला रिफायनरी होऊ देणार नाही. काय ताडफडायचे तेवढं ताडफडा. असलेले नसलेले सगळे नारळ फोडा मला काही फरक पडत नाही, असे राऊत म्हणाले.
तुमची दलाली गेल्याचे मला दुःख नाही. लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. प्रमोद जठार म्हणजे दलालीतील नंबर एक माणूस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मी नाणार व्यायला देणार नाही. नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय दुटप्पी भूमिका घेणारे आधी नाणारला विरोध आणि आता भाजप मध्ये गेल्यानंतर लोटांगण घातलं. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आगंण म्हणून राणेंना दिल नाही, असेही राऊत म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये जिल्हा बँकेचे अधक्ष्य सतीश सावंताच्या निकटवर्तीयावर जो हल्ला झाला यावर देवगड नगरपंचायत निवडणूकीच्या प्रचार सभेत खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे. राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अधक्ष्याशी स्पर्धा करण्याची ताकद नाही. म्हणून 2014 नंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात रक्तरंजित निवडणूकाच्या कामाला सुरुवात केली आहे. राणेंच्या गुंडांनी महाविकास आघाडीच्या जिल्हा बँक प्रचार प्रमुखांवर हल्ला केला. गाडीने पाडलं आणि तलवारीने हल्ला केला. या निवडणुकीत रक्तरंजित इतिहास नारायण राणे पुरस्कृत लोक करत आहेत. प्रामाणिक पध्दतीने काम करणाऱ्याना हात लावल तर तुमच्या गुंडांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही असा थेट राणेंना इशारा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.