Bhaskar Jadhav : भाजपच शिंदे गटाला सुरुंग लावणार, भास्कर जाधवांचा थेट आरोप, म्हणाले, भाजपच्या मशीनमध्ये ED ची पावडर
Bhaskar Jadhav : शिंदे गटातील 40 आमदार स्थिर राहू नये, यासाठी स्वत: भाजप प्रयत्न करत आहे. भाजपच शिंदे गटाला सुरुंग लावणार असल्याचा थेट आरोप शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला आहे.
Bhaskar Jadhav : शिंदे गटातील (Shinde Group) आमदार जास्त काळ समाधानी राहू शकणार नाहीत हे आम्हाला माहीत होते, असं वक्तव्य शिवसेना उपनेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केलं. उद्धव ठाकरेंना सत्तेवरुन खाली आणण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नसल्यानं त्यांनी शिवसेनेचे 40 आमदार फोडल्याचे जाधव म्हणाले.पण हे 40 आमदार सुद्धा स्थिर राहू नये, यासाठी स्वत: भाजप प्रयत्न करत आहे. भाजपच शिंदे गटाला सुरुंग लावणार असा थेट आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते भास्कर जाधव यांनी नालासोपारात कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा घेतला. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अनेक विषयांवरुन सरकारवर टीका केली. ठाकरे गटातून फुटलेल्या आमदारांत सुरु असलेली नाराजगी, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रसेखर बावनकुळे यांनी शिंदे-फडणवीस या दोघांना संताजी धनाजीची दिलेली उपाधी, यासह गजानन किर्तिकारांचा शिंदे गटातील पक्षप्रवेश यावरही त्यांनी कडाडून टीका केली.
भाजपच्या मशीनमध्ये ED ची पावडर असावी
जे जे भाजपात गेले ते सर्व क्लिन झाले आहेत. जे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये किंवा त्यांच्या विरोधात आहेत ते चरित्रहीन आहेत. त्याच लोकांनी जर त्यांना सपोर्ट केला किंवा भाजपात गेले तर ते चारित्र्य संपन्न होतात. त्याच संस्कारातून चित्राताई बोलल्या असल्याचे जाधव म्हणाले. शिवसेनेत असणारे संजय राठोड यांचे प्रकरण भाजपाच्या चित्रा वाघ यांनी फार टोकाचे लावून धरले होते. पण आता त्याच म्हणाल्या की आपण आता विषय संपवूया. चिञा वाघ यांच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण त्यांनी मला दम दिलाय की माझ्याबाबत बोलू नका म्हणून असेही जाधव म्हणाले. भाजपकडे कोणती मशीन आहे माहीत नाही, पण त्यांच्या मशीनमध्ये ED ची पावडर असावी असा टोलाही त्यांनी मारला आहे.
शिंदे-फडणवीसांवर टीका
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शिंदे आणि फडणवीस यांना संताजी धनाजीची जोडी म्हणून संबोधले आहे. याबाबत भास्कर जाधव यांना विचारलं असता त्यांनी बावनकुळेंना उपरोधात्मक टोला लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर 27 वर्षे महाराजांच्या मावळ्यांनी मराठ्यांच्या स्वराज्याचे रक्षण केले. मोघलांच्या गादीचा कळस कापून आणला त्यात अग्रगण्य संताजी आणि धनाजी हे होते. पण आपल्या राज्यात तर आपल्याच सत्तेला पाय उतार करणारे शिंदे आणि फडणवीस कसे संताजी धनाजी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे यांना मनस्ताप देण्यासाठी गजानन किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश
गजानन किर्तीकरांचा शिंदे गटातील पक्ष प्रवेश हा केवळ उद्धव ठाकरे यांना मनस्ताप देण्यासाठी करुन घेतला असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. कारण गजानन किर्तीकर यांचे वय पाहता ते काय पक्षाला योगदान देणार आहेत. त्यांच्या मुलाला माहीत आहे की खरी शिवसेना कोणती आहे, त्यामुळं तो युवासेनेसोबत असल्याचे जाधव म्हणाले. गजानन किर्तीकर जर आहे तिथे राहिले असते तर त्यांचा खूप मोठा सन्मान झाला असता असेही जाधव म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: