एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेना नारायण राणेंना किंमत देत नाही : देसाई
कोल्हापूर : "शिवसेना नारायण राणेंना किंमत देत नाही," असा प्रहार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या बातमीच्या चर्चेनंतर सुभाष देसाई कोल्हापुरात बोलत होते.
काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये गेल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, या बातम्या चुकीच्या असून राणे कोणत्याही पक्षात गेले तरी शिवसेनेला कोणताही फरक पडत नसल्याचंही सुभाष देसाई यांनी म्हटलं.
नारायण राणे यांना कोणी कोणत्या पक्षात घ्यायचं हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. राणे कोणत्याही पक्षात गेले तरी शिवसेनेला कोणताही फरक पडत नाही, सुभाष देसाई म्हणाले.
शिवसेना प्रवेशासाठी राणेंचा आटापिटा, नितेश राणे म्हणतात...
शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी आटापिटा केल्याची बातमी धादांत खोटी असल्याचं स्वाभिमानी संघटनेचे नेते नितेश राणे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली काम करावं, इतकी वाईट वेळ राणे कुटुंबावर आली नाही, असंही ते म्हणाले.
त्यावर बोलताना सुभाष देसाई म्हणाले की, "आम्ही असल्या गोष्टींची दखलच घेत नाही. असे किती आले आणि गेले, शिवसेना त्या सगळ्यांना पुरुन उरलेली आहे. अशा अनेकांना आम्ही टोलवूल लावलेलं आहे. हा विषय शिवसेनेवर परिणाम करणारा नाही. ज्या त्या पक्षाने ठरवावं, त्यांना काय परवडेल, त्यांना काय झेपेल, त्यांचं काय होईल. ते त्या संघटनेने, पक्षाने ठरवावं. आमचा तो विषयच नाही."
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
करमणूक
Advertisement