एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कर्जमाफीवरुन शिवसेना आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी ढोल वाजवून आंदोलन
मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आज शिवसेनेनं राज्यात ठिकठिकाणी ढोल वाजवून आंदोलन केलं. सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी पुरेशी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे, तसंच जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत सविस्तर माहिती मिळाली पाहिजे, या मागणीसाठी शिवसेनेनं हे आंदोलन केलं. तसंच लवकरात लवकर शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. मात्र ही कर्जमाफी पुरेशी नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेनं लावून धरली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल रविवारी सह्याद्रीवरील 'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमात दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा पुनरुच्चार केला.
शिवसेनेनं याआधीही शेतकऱ्यांची बाजू लावून धरत त्यांना तातडीची 10 हजारांची मदत मिळवून दिली होती. आता सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी, यासाठी राज्यभर जिल्हा बँकासमोर ढोल वाजवून आंदोलन केलं.
नाशिक जिल्हा बँकेसमोर शिवसेनेचं ढोल वाजवून आंदोलन
नाशिक : नाशिकमध्ये शिवसेनेनं जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवत आंदोलन केलं. संपूर्ण कर्जमाफी आणि सविस्तर माहिती मिळाली पाहिजे या मागणीसाठी आंदोलन केलं. विशेष म्हणजे नाशिक जिल्हा बँकेत अध्यक्ष उपाध्यक्ष शिवसेनेचेच आहेत.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल-ताशा आंदोलन
ठाणे : ठाण्यातही शिवसेनेने जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल ताशा आंदोलन केलं. अजून एकाही शेतकाऱ्याला कर्जमाफी नाही दिली, यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण 31 हजार पेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. पण वारंवार बदलणाऱ्या शासनाच्या नियमामुळे कर्जमाफी झाली नसल्याचा आरोप शिवसेनेनं केला. शेतकरी कर्जफेड करत नाही तेव्हा बँक त्याच्या घरसमोर ढोल ताशा वाजवते, म्हणून आज बँकेसमोर ढोल-ताशा आंदोलन करण्यात आलं, असं शिवसेनेतर्फे सांगण्यात आलं.
कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करा!
पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचा आरोप करत शिवसेनेकडून आज जिल्हा मध्यवर्ती बँकांसमोर ढोल वाजवा आंदोलन करण्यात आलं . पुण्यातही पुणे स्टेशन परिसरात असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयासमोर शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमले आणि त्यांनी कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याची मागणी केली.
औरंगाबादमध्ये खा. चंद्रकांत खैरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन
औरंगाबाद : औरंगाबादमध्येही शिवसेनेनं ढोल वाजवा आंदोलन केलं. यात शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी ढोल वाजवला.
अहमदनगर जिल्हा बँकेसमोर शिवसेनेचं आंदोलन
अहमदनगर : अहमदनगरला शिवसेनेनं जिल्हा बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन केलं. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याची मागणी यावेळी शिवसेनेनं केली. त्याचबरोबर सरकारनं सरसकट कर्जमाफी करण्याची सेनेनं मागणी केली.
सोलापूरमध्ये शिवसेनेकडून सरकारचा निषेध
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर सेनेच आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेचं आंदोलन. ढोल वाजवून केला शासनाचा निषेध. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे गावागावात लावावी यासाठी सेनेच आंदोलन.
मनमाड- संपूर्ण कर्जमाफी करत शेतकऱ्यांचा 7-12 कोरा व्हावा यासाठी शिवसेनेचे बँकांपुढे ढोल बजाओ आंदोलन; बँक व्यवस्थापकांना दिले निवेदन
यवतमाळ मध्ये आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शिवसेना जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement