एक्स्प्लोर

Shivsena : जो निर्णय द्यायचा आहे तो द्या, आम्ही पुन्हा तुमच्याकडे येणार नाही, ठाकरे गटाचे एक घाव दोन तुकडे, आजच्या सुनावणीत काय काय घडलं?

Maharashtra Politics : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर असून त्यावर आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. 

मुंबई: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत (Shivsena MLA Disqualification Case) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या (Rahul Narvekar) समोर सुनावणी पार पडली. त्यामध्ये शिंदे गटाकडून निहार ठाकरे यांनी बाजू मांडली तर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. जो निर्णय द्यायचा आहे तो द्या, आम्ही पुन्हा तुमच्याकडे येणार नाही असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला. तर शिंदे गटाकडून कागदपत्रांसाठी दोन आठवड्यांच्या वेळेची मागणी करण्यात आली. दोन्हीकडची बाजू ऐकूण घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना कागदपत्रांच्या देवाणघेवाणीसाठी एका आठवड्याचा वेळ दिला आहे. 

विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीवेळी आज नेमकं काय घडलं आणि दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद खालीलप्रमाणे, 

शिंदे गटाचे वकील

आम्हाला ठाकरे गटाकडून दाखल झालेल्या याचिकेसंदर्भातील कागदपत्रे मिळाली नाहीत, त्यामुळे आमची बाजू मांडण्यास आम्हाला अडचण आहे.

ठाकरे गटाचे वकील

विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडे आम्ही सर्व कागदपत्रे दाखल केली आहेत. या संदर्भातील कागदपत्रे देण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष कार्यालयाची आहे.

शिंदे गटाचे वकील

सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय अगदी बरोबर आहे; परंतु ठाकरे गट अपात्रतेची याचिका दाखल करताना अध्यक्षांसमोर प्रोसिजरप्रमाणे कागदपत्रे सादर न करता थेट सुप्रीम कोर्टात गेले.

यावर ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद

आम्ही 23,25,27 जून 2022 त्यासोबतच 3 आणि 5 जुलै 2022 मध्ये विधानसभा अध्यक्षांकडे वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या. व्हिपचं उल्लंघन केलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना निलंबित केल्याशिवाय पर्याय नव्हता; मात्र वेळकाढूपणा होत होता. त्यामुळे आम्ही थेट सुप्रीम कोर्टात गेलो. 

शिंदे गटाचे वकील

तीन महिन्यात निकाल द्यावा असं कुठेही सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले नाहीत. अर्जकर्त्यांनी वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत, त्यामुळे वेळ लागू शकतो.

ठाकरे गटाचे वकील

41 याचिका वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहेत. अनेक याचिकांचा विषय एकच आहे. त्यामुळे या सगळ्या याचिका शेड्युल 10 नुसार एकत्रित कराव्यात. कर्नाटक अध्यक्षांनी जो निर्णय घेतला होता त्याची ऑर्डर बघावी. शेड्युल 10 प्रमाणे ही सुनावणी संपवावी. जास्तीत जास्त 7 दिवसात सुनावणी संपवून निर्णय द्या. 

तुम्हाला जो निर्णय द्यायचा आहे तो द्या, आम्ही पुन्हा तुमच्याकडे रिव्ह्यूसाठी येणार नाही.

शिंदे गटाचे वकील

गणेशोत्सव असल्याकारणाने आम्हाला दोन आठवड्यांचा वेळ द्यावा, त्यानंतर आम्ही त्यावर अभ्यास करून उत्तर पाठवू.

ठाकरे गटाचे वकील

गणेशोत्सवाचे निमित्त नको, तातडीने निर्णय द्यावा

विधानसभा अध्यक्ष

याचिकाकर्त्यांनी केलेल्या याचिकांची सविस्तर प्रत दोन्ही गटांना प्राप्त होईल, यामध्ये 10 दिवसांमध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी याचिकेवर लेखी उत्तर सादर करावे. विधानसभा अध्यक्ष कार्यालय 7 दिवसात कागदपत्रांची छाननी करेल.

ही बातमी वाचा: 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : बँकेच्या कर्जापायी रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, दारू पाजून शेजारच्या मित्रालाच संपवलं; 8 महिन्यानंतर थरारक घटनेचा उलगडा, गोंदियात खळबळ
बँकेच्या कर्जापायी रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, दारू पाजून शेजारच्या मित्रालाच संपवलं; 8 महिन्यानंतर थरारक घटनेचा उलगडा, गोंदियात खळबळ
Manoj Jarange Patil Maratha Reservation: मराठा उपसमिती बरखास्त करा ते 58 लाख मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगेंच्या 10 प्रमुख मागण्या कोणत्या?
मराठा उपसमिती बरखास्त करा ते 58 लाख मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगेंच्या 10 प्रमुख मागण्या कोणत्या?
Maharashtra Live blog updates: कल्याणमध्ये भीषण अपघात; सुमित कंपनीच्या  घंटागाडीखाली 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: कल्याणमध्ये भीषण अपघात; सुमित कंपनीच्या  घंटागाडीखाली 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Monsoon Rain: आनंदाची बातमी: मान्सून अंदमान-निकोबारच्या बेटांवर पोहोचला, हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट
आनंदाची बातमी: मान्सून अंदमान-निकोबारच्या बेटांवर पोहोचला, हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Ahilyanagar Leopard News: समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
NEET Scam: NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
CSK Playoffs Scenarios : MS धोनी नाही, मुख्य बॉलरही बाहेर, सर्व काही विरोधात गेले तरी मराठमोळा ऋतुराज नडला; CSK अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? वाचा समीकरण
MS धोनी नाही, मुख्य बॉलरही बाहेर, सर्व काही विरोधात गेले तरी मराठमोळा ऋतुराज नडला; CSK अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? वाचा समीकरण
NCP Sunil Tatkare and Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीच्या कार्यालयात मोठी घडामोड, तटकरे-पटेलांच्या गटातील नेत्याला कार्यालयात जाण्यापासून रोखलं, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीच्या दिल्लीच्या कार्यालयात मोठी घडामोड, तटकरे-पटेलांच्या गटातील नेत्याला कार्यालयात जाण्यापासून रोखलं, नेमकं काय घडलं?
Embed widget