Shivrajyabhishek Sohla 2025: शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड प्रशासनाचा मोठा निर्णय, मुंबई गोवा महामार्गासह या मार्गांवर अवजड वाहनांना नो एन्ट्री
शिवराज्याभिषेक सोहळा : रायगडात अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय

Raigad: रायगड किल्ल्यावर 6 जून 2025 रोजी पार पडणाऱ्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार असल्याने कोणतीही वाहतूक कोंडी किंवा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, रायगड जिल्ह्यात 5 जून रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून ते 6 जून रोजी रात्री 10 वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. (Shivrajyabhishek Shohla)
शिवराज्याभिषेक सोहळ्याला राज्यभरातून हजारो शिवप्रेमी उपस्थित राहणार असल्याने त्यांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय सोहळा अनुभवता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
कोणकोणत्या मार्गांवर अवजड वाहनांना बंदी?
1. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग:
वाकणफाटा, नागोठणे ते कशेडी दरम्यान या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल.
2. माणगाव–निजामपूर मार्ग:
माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावर अवजड वाहनांना परवानगी नाही.
3. महाड–नातेखिंड मार्ग:
या मार्गे पाचाड ते रायगड किल्ला मार्गावरील सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांकरिता बंदी लागू करण्यात आली आहे.
शिवराज्याभिषेक सोहळा
रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा श्री शिवराज्याभिषेक दिन (हिंदू साम्राज्य दिन) यंदा जून 8 व 9, 2025 रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात किल्ले रायगडावर साजरा केला जाणार आहे. लाखो शिवभक्त, मावळे, महिलांपासून लेकरांपर्यंत, देशभरातून रायगडाकडे येणार आहेत. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीला रायगड किल्ला पुन्हा एकदा शिवमय होणार आहे.गडावरील जिजाऊ पालखी, शिवराज्याभिषेक मूर्ती पूजन, महाआरती, तसेच ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याचं नाट्यरूपांतर, पारंपरिक वाद्य व तलवारबाजी व विविध लोककला व सांस्कृतिक कार्यक्रम, देशभरातून आलेल्या मंडळींनी आयोजित केलेले विविध शिवप्रेमी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
हेही वाचा:
























