एक्स्प्लोर

Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं

Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यामुळे आता पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलंय.

Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: सध्या राज्याच्या राजकीय (Maharashtra Politics) वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (Local Body Elections) बिगुल वाजलंय. सगळीकडे निवडणुकांचे वारे वाहत असतानाच प्रत्येक पक्षात स्थानिक पातळीवर अनेक महत्त्वाचे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच, आता पुण्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला (MNS) मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. पिट्या भाई (Pitya Bhai) म्हणजेच, अभिनेता रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) यानं राज ठाकरेंच्या मनसेची साथ सोडली असून आता भाजपचं (BJP) कमळ हाती घेतलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पिट्या भाईसोबतच पुण्यातील (Pune) मनसेच्या पदाधिकाऱ्यांन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडल्याचं दिसतंय. 

पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यामुळे आता पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलंय.  अभिनेता रमेश परदेशीसोबत पुण्यातील मनसे चित्रपट सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. 

पिट्या भाईसोबतच मनसेचे इतर पदाधिकारीही भाजपमध्ये 

पिट्या भाईला राज ठाकरेंनी झापल्यापासूनच तो नाराज असल्याची चर्चा रंगलेली. अखेर त्यानं मनसेची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. पण, पिट्या भाईनं उचललेल्या या पावलामुळे पुण्यात एका रात्रीतचं पुण्यात मनसे चित्रपट सेनेला मोठं खिंडार पडलंय. पिट्या भाईसोबतच पुण्यातील मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपचे प्रदेधाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिट्याभाई आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. 

पिट्या भाईनं मनसेची साथ सोडण्याचं कारण काय? 

अभिनेता रमेश परदेशी म्हणजे, पिट्या भाई भाजपात जाणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून रंगलेली. त्याला कारण होतं, स्वतः राज ठाकरेंनी पिट्या भाईंचा केलेला पाणउतारा. त्याचं झालेलं असं की, रमेश परदेशीनं आपल्या सोशल मीडियावर संघाच्या गणवेशातला एक फोटो पोस्ट केलेला. मी माझ्या विचारांसोबत असा मजकूर त्यानं या फोटोसोबत लिहिलेला. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना पिट्या भाईच्या याच पोस्टवरून झाप झाप झापलं होतं. त्यानंतर पुन्हा रमेश परदेशीनं सूचक पोस्ट केलेली. आपण नव्या जबाबदारीसाठी सज्ज असल्याचं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं. अखेर पिट्या भाईनं भाजपमध्ये प्रवेश करुन कमळ हाती घेतलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ramesh Pardeshi: संघाचा गणवेश घालून मिरवणाऱ्या पिट्या भाईचा राज ठाकरेंकडून सर्वांदेखत पाणउतारा, मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करताच म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget