सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ जन्मस्थळासमोर बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल
सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ (Rajmata Jijabai) जन्मस्थाळासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बुलढाणा : सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ (Rajmata Jijabai) जन्मस्थाळासमोर अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणा येथील सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव राजवाड्यात दरवर्षी 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. परंतु, या जन्मोत्सवाआधीच ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 447 नुसार म्हणजे परवानगी शिवाय अतिक्रमण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार दिली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सिंदखेडराजा पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. दरम्यान या भागात पुतळा बसविल्याची माहिती परिसरात पसरताच या चौकात गर्दी झाली. शिवसेनेचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी या पुतळ्याची पूजाही केली आहे.
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवावर कोरोनाचं सावट
दरम्यान, यंदा 12 जानेवारी रोजी होणाऱ्या राजमाता जिजाऊ जन्मोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. या सोहळ्यासाठी फक्त 50 जणांना परवानगी दिली आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांना कोरोना लशीचे दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आणि आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागणार आहे.
सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव राजवाड्यासमोर अज्ञातांनी बसवला शिवारायांचा पुतळा
महत्वाच्या बातम्या
- Rajmata Jijabai Birth Anniversary : सिंदखेडराजा येथे होणाऱ्या राजमाता जिजाऊ जन्मोत्सवावर कोरोनाचं सावट, फक्त 50 जणांना परवानगी
- Coronavirus In Mumbai: मुंबईकरांनो सावधान! आज 19,474 नव्या रुग्णांची नोंद, 7 जणांचा मृत्यू
- Rajesh Tope : गर्दी वाढल्यास दारुच्या दुकानांवर निर्बंध, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
