एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
रायगडावर आज 345 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. दरवर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
रायगड: रायगडावर आज 345 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. दरवर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी रायगड किल्ल्यावर दाखल झाले आहेत. किल्ले रायगडाला सर्व बाजूंनी धुक्याची चादर पसरली असून निसर्ग सौंदर्यानं रायगड फुलला आहे. याच धुक्याच्या शालीत किल्ले रायगडावर सध्या शिवराज्याभिषेक सोहळा सुरु आहे.
अखिल भारतीय राज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा साजरा करण्यात येतो. या महोत्सवास किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह त्यांचे सुपुत्र युवराज शहाजीराजे उपस्थित राहतात.
या सोहळ्यासाठी संभाजीराजे काल दुपारी 3.30 वा. चित्तदरवाजामार्गे शिवभक्तांसमवेत पायी गडावर गेले. नगारखाना इथं 21 गावांतील सरपंच आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत गडपूजन झाले. गडावर उत्खननात मिळालेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संभाजीराजे यांच्या हस्ते झाले.
होळीच्या माळावर मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, शाहिरी जलसा, छ. संभाजीराजे यांनी शिवभक्तांशी थेट संवाद साधला. रात्री 8.30 वा. गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ घालण्यात आला. जगदीश्वर मंदिरात वारकरी सांप्रदायांकडून जगदीश्वराचे कीर्तन, जागर, काकडआरती, शाहिरी कार्यक्रम झाला.
रायगडावर राज्य राखीव दल, शीघ्रकृती दलाच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. तीन उपविभागीय पोलिस अधिकारी, नऊ पोलिस निरीक्षक, 18 एपीआय, पीएसआय, 168 कर्मचारी, 25 महिला कर्मचारी, 65 वाहतूक पोलिस, 20 वॉकीटॉकी कर्मचारी यांसह बॉम्ब शोधक पथक तैनात केले आहे.
आजचे कार्यक्रम
सकाळी 6 वा. नगारखाना येथे ध्वजपूजन, 6.50 वा. राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम, 9.30 वा. छ. शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन, 9.50 वा. छ. संभाजीराजे आणि युवराज शहाजीराजे यांचे राजसदरेवर स्वागत, 10.10 वा. छ. संभाजीराजे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांवर अभिषेक तसेच मेघडंबरीतील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक, 10.25 वा. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंग सावंत यांचे प्रास्ताविक, 10.30 वा. छ. संभाजीराजे यांचे शिवरायांना अभिवादन, 11 वा. शिवपालखी सोहळा. या पालखी सोहळ्याची सांगता जगदीश्वर मंदिर आणि छ. शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement