एक्स्प्लोर

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर शिवसेनेची तटस्थ भूमिका काँग्रेसच्या दबावापोटी : फडणवीस

महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटपच अद्याप जाहीर झालं नसल्यानं अधिवेशनात कुणाला प्रश्न विचारायचे, असा टोलाही फडणवीसांनी या वेळी दिला आहे. फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला जवळपास दोन आठवडे झाले आहेत.

मुंबई : नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला लोकसभेत पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं राज्यसभेत तटस्थ भूमिका घेण्याचा विचार करणं हे काँग्रेसच्या दबावापोटी आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. संसदीय कामकाज समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. काल शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. मग आता राज्यसभेतील मतदानाआधी शिवसेना संभ्रमात कशामुळे आहे, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना आपली जुनी भूमीका कायम ठेवल आणि कोणाच्या दबावाखाली येणार नाही, अशी अपेक्षा फडणवीसांनी या वेळी व्यक्त केली. महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटपच अद्याप जाहीर झालं नसल्यानं अधिवेशनात कुणाला प्रश्न विचारायचे, असा टोलाही फडणवीसांनी या वेळी दिला आहे. फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला जवळपास दोन आठवडे झाले आहेत. अद्याप खातेवाटपच केलेलं नाही. अशा परिस्थितीत उत्तरं कोण देणार असेही ते म्हणाले. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंसह काँग्रेस, राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली होती. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मागणीचं पुढे काहीच झालेलं नाही. शेतकऱ्यांना जी मदत मिळाली पाहिजे ती मिळत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहे. चार कामे कमी केली तरी चालेल पण मदत मिळाली पाहिजे. यासोबतच अनेक प्रकल्पांवर ठाकरेंनी लावलेल्या स्थगितीवरही बोट ठेवत फडणवीसांनी टीका केली आहे. फडणवीस म्हणाले, खातेवाटप तर अद्याप झालेलं नाही पण सुरू असलेल्या प्रकल्पाच्या स्थगतीच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत पाच ते सहा दिवसांच अधिवेशन म्हणजे एक औपचारिकता आहे. जी महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार पार पाडत आहे. लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला काल पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेने आज आपली भूमिका बदलली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत राज्यसभेत विधेयकाला समर्थन देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. देशातील नागरिकांसमोरील रोजच्या जीवनातील आवश्यक प्रश्न सोडवणं अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही काय भूमिका घ्यावी, हे आम्हाला कोणी सांगू नये, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget