Shiv Sena vs Shinde Court Room Live : सिब्बलांचा जोरदार युक्तीवाद, शिंदे गटाचं उत्तर काय? कोर्टरुममधून लाईव्ह
Shivsena Supreme Court Hearing Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर लाईव्ह पाहू शकता...
Supreme Court Hearing Live : राज्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तापरिवर्तनाबाबत आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण शिवसेना कुणाची?, धनुष्यबाण कुणाचा?, याचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार की केंद्रीय निवडणूक आयोगात याकडे ठाकरे आणि शिंदे गटासह राज्याचं लक्ष लागलंय. सुप्रीम कोर्टात आज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर दुसरी सुनावणी होतेय. शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आलाय, त्याबाबत आयोगाचं कामकाज चालू राहणार की नाही हे कोर्टात ठरेल. जोपर्यंत सुप्रीम कोर्टातल्या प्रश्नांचा निकाल लागत नाही तोपर्यंत आयोगाकडून निर्णय होऊ नये ही उद्धव ठाकरे गटाची भूमिका आहे. तर आयोगाला यावर निर्णय घेऊ द्यावा अशी शिंदे गटाची मागणी आहे. याशिवाय आमदारांची अपात्रता आणि सरकारच्या वैधतेला दिलेलं आव्हान याबाबतच्या याचिकांवरही सुनावणी अपेक्षित आहे.
ही सुनावणी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर लाईव्ह पाहू शकता... (Shivsena Supreme Court Hearing Live)
शिंदे गटाची याचिका
- उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना निलंबित करण्यासाठी बजावलेल्या नोटीसविरोधात याचिका.
- शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची याचिका
शिवसेनेची याचिका
- विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड होण्याआधी शिंदे गटाच्या 16 आमदारांना निलंबित करण्याची नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावली होती, या आमदारांना निलंबित करावे,
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या व्हिपला मान्यता दिली होती, त्याविरोधातील याचिका.
- विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेले अधिवेशन बेकायदा होते, असा दावा करणारी याचिका.
सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा कोर्टात युक्तिवाद :
निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाचा मूळ पक्ष असल्याचा दावा, मात्र पक्षाचं सदस्यत्व आहे की, नाही; हे ठरवणं महत्त्वाचं; ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
व्हीप धुडकावणाऱ्यांवर राजकीय पक्षाला कारवाईचे अधिकार, ते संबंधित पक्षाचे असतात, अपक्ष नाही; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
घटनेत राजकीय पक्षाची विस्तृत व्याख्या कुठेही नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिपण्णी
अपात्रतेच्या निर्णयाचा पक्षचिन्हाच्या निर्णयावर परिणाम कसा? कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाचे सवाल
राजकीय पक्षाचे सदस्य विधिमंडळ पक्षाचे सदस्य असतील, तर ते वेगळा गट स्थापन करु शकत नाही; ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
शिंदे गट कोणत्या भूमिकेत आयोगात गेला? विधीमंडळ पक्षाचा सदस्य की, राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून? सर्वोच्च न्यायालयाचा वकिलांना प्रश्न
राजकीय पक्षाचे सदस्य असतील तर आयोगात दाद मागण्याचा हक्क आहे, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर कोर्टाची टीप्पणी
लेखी युक्तीवादबाबत सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं काय?
निवडणूक आयोगाचा मुद्दा मूळ याचिकेतून निर्माण झाला, निर्णय होणं गरजेचं आहे, सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी