Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : धगधगत्या मशालीने घडविला होता इतिहास, शिवसेना अन् मशालीचं नात जुनंच
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : यापूर्वी देखील शिवसेनेचं मशाल हे चिन्ह होतं. छगन भुजबळ नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना शिवसेनेचे मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं.
![Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : धगधगत्या मशालीने घडविला होता इतिहास, शिवसेना अन् मशालीचं नात जुनंच shiv sena uddhav balasaheb thackeray mashal symbol history now details Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : धगधगत्या मशालीने घडविला होता इतिहास, शिवसेना अन् मशालीचं नात जुनंच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/886a832382107ed2880f446e083b62a51665417536611328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेला आज मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. यापूर्वी देखील शिवसेनेचं मशाल हे चिन्ह होतं. छगन भुजबळ नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना शिवसेनेचे मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं. 2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि छगन भुजबळ मशाल याच चिन्हावर शिवसेनेचे एकमेव आमदार झाले. त्यानंतर एप्रिलमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली त्यात देखील ते नगरसेवक पदासाठी उभे होते.
1985 साली बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. त्यावेळी धगधगती मशाल हेच चिन्ह होते. या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली. त्यामुळे यापूर्वी देखील धगधगत्या मशालीने इतिहास घडविला होता अशा भावना आता शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहेत.
शिवसेनेतील बंडाळीमुळे पक्षात दोन गट पडले. दोन्ही गटाकडून आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा करण्यात आला. हा वाद न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला. अखेर निवडणूक आयोगाने शिवसेना नाव शिवसेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. त्यांतर दोन्ही गटाला आज दुपारी एक वाजेपर्यंत पक्षासाठी तीन नावे आणि तीन चिन्हं देण्याचे निर्देश निवडणूक आयोगने दिले आहे. दोन्ही गटाने आपापली चिन्हं आणि नावं दिल्यानंतर सोमवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला नावं दिली. तर शिंदे गटाला चिन्हासाठी पुन्हा तीन पर्याच सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने आज ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेबत ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Tthackeray) हे नाव दिलं तर शिंगे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिल्यानंतर आता पुन्हा यापूर्वीच्या मशाल चिन्हाची चर्चा होत आहे. शिवसेनेने देखील त्यांच्या ट्विटर हॅंडलवर ठाकरे गटाचा लोगो शेअर केला आहे.
हाती घेऊ "मशाल" रे!
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) October 10, 2022
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
निशाणी : मशाल pic.twitter.com/ryPOTMikxX
महत्वाच्या बातम्या
Mashal : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं चिन्ह 'मशाल'; शिंदे गटाला सध्यातरी चिन्ह नाही, नवे पर्याय देण्याचे निर्देश
Shivsena : ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव, तर शिंदे गट आता 'बाळासाहेबांची शिवसेना'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)