News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

Shivsena : ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव, तर शिंदे गट आता 'बाळासाहेबांची शिवसेना'

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला अद्याप कोणतंही चिन्ह मिळालं नाही.

FOLLOW US: 
Share:

मुंबई: उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. 

दोन्ही गटांच्या नावातील दुसरा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केले आहेत.  उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आलं आहे. तर त्यांना 'मशाल' हे चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव देण्यात आलं आहे. 

उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल या चिन्हाची मागणी केली होती. हे धार्मिक चिन्ह असल्याने हे देता येत नाही. तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूतील पक्षाचं चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. 

शिंदे गटाला नव्याने तीन चिन्हं द्यायचे निर्देश 

शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पहिल्या दोन चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने आधीच भूमिका स्पष्ट केली. तर गदा हे चिन्ह धार्मिक चिन्ह असल्याने ते देता येणार नाही असं सांगत शिंदे गटाने तीन नव्या चिन्हांचा पर्याय द्यावा असं सांगितलं आहे. 

पहिल्याच राजकीय डावपेचामध्ये उद्धव ठाकरे जिंकल्याचं शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी म्हटलं. यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना या तिन्ही नावांचा समावेश आहे असंही ते म्हणाले. 

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांनी आपल्या चिन्हांचा आणि नावाचा पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी पक्षांच्या तीन नावाची आणि तीन चिन्हांच्या पर्यायाची नावं दिली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. 

Published at : 10 Oct 2022 07:44 PM (IST) Tags: election commission of india Uddhav Thackeray : Uddhav Thackeray 'Eknath Shinde SHIVSENA Mashal Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Balasahebanchi Shivsena

आणखी महत्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar Vs Sanjay Raut : 'संजय, कितना झूठ बोलोगे?' खंजीर खुपसणारा फोटो ट्वीट करत प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल!

Prakash Ambedkar Vs Sanjay Raut : 'संजय, कितना झूठ बोलोगे?' खंजीर खुपसणारा फोटो ट्वीट करत प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल!

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या डोक्याचा ताप वाढला, संजय गायकवाड यांची बंडखोरी, दोन अर्ज भरले!

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या डोक्याचा ताप वाढला, संजय गायकवाड यांची बंडखोरी, दोन अर्ज भरले!

'एक घाव दोन तुकडे होऊन जाऊदे'; शिंदे गटाच्या नेत्याचा भाजपला थेट इशारा

'एक घाव दोन तुकडे होऊन जाऊदे'; शिंदे गटाच्या नेत्याचा भाजपला थेट इशारा

माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 

माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 

Ashok Chavan: "...नाहीतर मी बोंबलत बसलो असतो"; भर सभेत अशोक चव्हाण जाहीरपणे बोलले

Ashok Chavan:

टॉप न्यूज़

मराठवाड्यात पाणी संकट! पाण्यासाठी रात्र काढावी लागते जागून, नेतेमंडळी मात्र प्रचारात व्यस्थ

मराठवाड्यात पाणी संकट! पाण्यासाठी रात्र काढावी लागते जागून, नेतेमंडळी मात्र प्रचारात व्यस्थ

MVA Seat Sharing In Maharashtra : वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!

MVA Seat Sharing In Maharashtra : वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!

Hemant Godse : भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठली; नाशिकच्या जागेवर घमासान सुरुच!

Hemant Godse : भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठली; नाशिकच्या जागेवर घमासान सुरुच!

Pooja Sawant and Siddhesh Chavan Wedding : 'मन धागा धागा जोडते नवा...', पूजा-सिद्धेशच्या लग्नातले हळवे क्षण; सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर

Pooja Sawant and Siddhesh Chavan Wedding : 'मन धागा धागा जोडते नवा...', पूजा-सिद्धेशच्या लग्नातले हळवे क्षण; सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर