छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार ? अंजली दमानियांच्या दाव्यावर संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया
Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळा रंगली आहे.
Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळा रंगली आहे. कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केलाय. भुजबळांनी दमानियांचा दावा खोडून काढला. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हा त्यांना जेलमध्ये पाठवलं होतं आता त्यांची फाईल भेटत नाही. भाजपमध्ये गेले की पवित्र बनला जातं, असे संजय राऊत म्हणाले.
भुजबळ भाजपमध्ये जाणार ? काय म्हणाले राऊत
अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचं ट्वीट केले. त्यानंतर यावर राजकीय चर्चेला उदाण आले. संजय राऊत यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले की, मी काय बोलू शकतो, ईडीला विचारावा लागेल. इडी अँटी करप्शन आणि भाजपने त्यांच्यावर आरोप लावले आहेत. तेव्हा त्यांना जेलमध्ये पाठवलं होतं आता त्यांची फाईल भेटत नाही. आता अंजली दमानिया यांचं वक्तव्य ऐकला आहे, छगन भुजबळ कोणत्या पार्टीत जातील? काय करतील ? याबद्दल मी बोलू शकत नाही. पण ते बीजेपीचा चेहरा बनू शकतात असा जर म्हणणं असेल. तर अजित पवार , हसन मुश्रीफ ,भावना गवळी त्यांचा चेहरा बनले आहेत. भ्रष्टाचार हा भाजपचा चेहरा आहे आणि राहणार आहे. जो भ्रष्टाचारी भाजपसोबत चालेल तो पवित्र बनला जाईल, असे संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडी बैठकीवर संजय राऊत काय म्हणाले ?
आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि लोकप्रिय नेते बाळासाहेब आंबेडकर हे चर्चेला बसणार आहेत, हे नक्की आहे. कारण आता महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला आहे. वंचितचा अधिकृतपणे समावेश केला आहे, त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे, असे संजय राऊत म्हणाले.
आज आम्ही सर्व एकत्र बैठकीला बसणार आहेत, आम्हाला आनंद आहे की प्रकाश आंबेडकर स्वतः चर्चेत सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचे हुकूमशाही हद्दपार करण्यासाठी स्वतः वंचित बहुजन आघाडी आणि माननीय प्रकाश आंबेडकर यांची सार्थ गरज आहे. त्यामुळे त्यांची मदत आमच्या लढाईत फार महत्वाची आहे. माननीय प्रकाश आंबेडकर स्वतः सहभागी होतील., अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
हेमंत सोरेन यांची अटक बेकायदेशीर -
हेमंत सोरेन यांची अटक बेकायदेशीर आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाई सुध्दा अशीच आहे. महाराष्ट्रात पहाटेचा शपथविधी होतो , अजित पवार देवगिरी बंगल्यावरून निघतात राजभवनात शपथविधी होतो. पण झारखंड येथे राज्यपाल शपथविधीसाठी चंपेन सोरेन यांना वेळ देत नाहीत, असा टोलाही यावेळी संजय राऊतांनी लगावला.