(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajan Salvi : राजन साळवी यांच्या अडचणी वाढणार? पत्नी आणि भावाला ACB ची नोटीस, अवैध मालमत्ता प्रकरण
Ratnagiri News : राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला एसीबीने नोटीस बजावली आहे. यामुळे राजन साळवी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Shiv Sena UBT MLA Rajan Salvi : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार राजन साळवी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आमदार राजन साळवी (Rajan Salvi's Wife) यांची पत्नी आणि भावाला एसीबीची नोटीस पाठवण्यात आली आहे. एसीबीकडून राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला नोटीस बजावण्यात आली आहे. जबाब नोंदवण्यासाठी आज रत्नागिरीच्या एससीबीच्या कार्यालयात राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला हजर राहण्याच्या सूचना या नोटीसीद्वारे देण्यात आल्या आहेत.
राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला ACB ची नोटीस
अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आज आमदार राजन साळवी यांची पत्नी अनुजा आणि भाऊ दिपक साळवी यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. जबाब नोंदवण्यासाठी त्यांना आज एसीबी कार्यालयात हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. एसीबीकडून सकाळी 10 वाजता कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका
राजन साळवी यांच्या चौकशीबाबत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, याबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. पक्ष फोडा ,घरं फोडा लोकांना भीती दाखवा आणि काही करा सत्तेत या. सत्तेतून येऊन महाराष्ट्र नुकसान करण्याचं काम ट्रिपल इंजिन सरकार करीत आहे, हे दुर्देव लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार पूर्णपणे अपयशी झालंय, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.
राजन साळवी यांच्यावर आरोप काय आहेत?
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून आतापर्यंत सात ते आठ वेळा चौकशी झाली आहे. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2009 ते २ डिसेंबर 2022 पर्यंत 14 वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवींवर ठेवण्यात आला आहे. साळवी यांच्याकडे 3 कोटी 53 लाख इतकी या बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख रुपये इतकी आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा हा 118 टक्के इतका जास्त असल्याचा आरोप आहे.
बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप
ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत 14 वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवींवर ठेवण्यात आला आहे. साळवी यांच्याकडे 3 कोटी 53 लाख इतकी या बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख रुपये इतकी आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा हा 118 टक्के इतका जास्त असल्याचा आरोप आहे.
यापूर्वी राजन साळवी यांनी सहा ते सातवेळा एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयामध्ये हजर लावली होती. तसेच त्यांचा भाऊ, पुतण्या, वहिनी, स्वीय सहाय्यक यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. एसीबीने राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.