एक्स्प्लोर

'शिंदे गट राजकीय पक्ष नाही, शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर, ते गुवाहाटीला का गेले?'- ठाकरे गटाचा आयोगासमोर युक्तीवाद

शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना (Uddhav Thackeray)  मिळणार की शिंदेंना मिळणार? महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे.

Shiv Sena Symbol Issue Election Commission : शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना (Uddhav Thackeray)  मिळणार की शिंदेंना मिळणार? महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर  महत्त्वाची सुनावणी सुरु आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आणि ठाकरेंना मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं. त्यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला. त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ठाकरे गटाच्या वतीनं आतापर्यंत कपिल सिब्बल यांनी ठामपणे युक्तीवाद केला आहे...

कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादातील महत्वाचे मुद्दे 

शिंदे गटाच्या याचिकेतील मुद्दे खोडण्याचा कपिल सिब्बल यांच्याकडून प्रयत्न, जर यांचं बंड झालं होतं तर एक महिना आयोगाकडे येण्यासाठी का लावला? 

राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे, शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर 

 ठाकरे गटाची कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही. ठाकरेंची कार्यकारिणी घटनेप्रमाणे आहे. 

राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या किंवा निवडणूक घ्या

एकनाथ शिंदेंचं प्रतिज्ञापत्र तपासून पाहा. आम्हाला प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्या. दोन्ही ठिकाणी आमचं संख्याबळ जास्त, सभागृहांमध्येही आमचं स्थान आहे 

पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ द्या, ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी, घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमच्याकडे, शिंदे गटाकडे प्रतिनिधी सभा नाही, जी आहे ती घटनाबाह्य 

शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता, 61 पैकी 28 जिल्हाप्रमुखांची प्रतिज्ञापत्र नाहीत
 
लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होतं, गुवाहाटीला का गेले? पक्षाच्या सभेला उपस्थिती न लावता ते गुवाहाटीला गेले, एकनाथ शिंदे आधी शिवसेनेत होते आणि ते कार्यरत होते.

राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटानं कोणती कागदपत्रं सादर केली आहेत का? शिंदे गट राजकीय पक्ष नाही. 

शिवसेनेच्या सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच, ठाकरे गटच खरी शिवसेना; ठाकरे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही, शिवसेनेची घटना सिब्बल यांच्याकडून आयोगासमोर सादर 

हा वाद म्हणजे संसदीय पद्धतीची थट्टा

दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्रं आयोगासमोर सादर

शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, 2,82,975 संघटनात्मक प्रतिनिधी, 19,21,815 प्राथमिक सदस्य अशा एकूण 22 लाख 24 हजार 950 पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे सादर केली आहे. तर शिंदे गटाने 12 खासदार, 40 आमदार, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, 2046 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि 4,48,318 प्राथमिक सदस्य अशा 4,51,127 पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवीण गायकवाडांचं पंढरपुरात जंगी स्वागत, दुग्धाभिषेक घालून केलं शुद्धीकरण
प्रवीण गायकवाडांचं पंढरपुरात जंगी स्वागत, दुग्धाभिषेक घालून केलं शुद्धीकरण
Eng vs Ind 3rd Test News : लॉर्ड्सवर वॉशिंग्टनचा 'सुंदर' शो! सिराज अन् बुमराहने पण मोडला इंग्लंडचा कणा, टीम इंडियासमोर फक्त 193 धावांचं लक्ष्य
लॉर्ड्सवर वॉशिंग्टनचा 'सुंदर' शो! सिराज अन् बुमराहने पण मोडला इंग्लंडचा कणा, टीम इंडियासमोर फक्त 193 धावांचं लक्ष्य
प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी 7 जणांवर गुन्हा, दोघांना अटक; आरोपी निघाला भाजप पदाधिकारी
प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी 7 जणांवर गुन्हा, दोघांना अटक; आरोपी निघाला भाजप पदाधिकारी
EPFO : ईपीएफओकडून व्याज जमा करण्यास सुरुवात, पीएफ पासबुक कसं डाऊनलोड करायचं?
ईपीएफओकडून व्याज जमा करण्यास सुरुवात, पीएफ पासबुक कसं डाऊनलोड करायचं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kashigaon Drugs Case : ब्लड 107 गँगचं ड्रग्स कनेक्शन, पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
Bank Controversy | नाशिक जिल्हा बँक: भुजबळ-कोकाटे वाद, गैरसमजाचा टोला
Ajit Pawar Hinjawadi | वाहतूक कोंडीवर कडक आदेश, 'टायरमध्ये घालून मारा' आणि अंधश्रद्धेवरही बोलले!
Bhandara Bridge Damage | तुफान पावसाने वाहून गेले ४ महिन्यांपूर्वीचे Bridge, निकृष्ट Construction चा फटका
World's Largest Camera | Dr. Kshitija Kelkar यांचा Chile वेधशाळेत समावेश, अवकाशाचा सखोल नकाशा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवीण गायकवाडांचं पंढरपुरात जंगी स्वागत, दुग्धाभिषेक घालून केलं शुद्धीकरण
प्रवीण गायकवाडांचं पंढरपुरात जंगी स्वागत, दुग्धाभिषेक घालून केलं शुद्धीकरण
Eng vs Ind 3rd Test News : लॉर्ड्सवर वॉशिंग्टनचा 'सुंदर' शो! सिराज अन् बुमराहने पण मोडला इंग्लंडचा कणा, टीम इंडियासमोर फक्त 193 धावांचं लक्ष्य
लॉर्ड्सवर वॉशिंग्टनचा 'सुंदर' शो! सिराज अन् बुमराहने पण मोडला इंग्लंडचा कणा, टीम इंडियासमोर फक्त 193 धावांचं लक्ष्य
प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी 7 जणांवर गुन्हा, दोघांना अटक; आरोपी निघाला भाजप पदाधिकारी
प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी 7 जणांवर गुन्हा, दोघांना अटक; आरोपी निघाला भाजप पदाधिकारी
EPFO : ईपीएफओकडून व्याज जमा करण्यास सुरुवात, पीएफ पासबुक कसं डाऊनलोड करायचं?
ईपीएफओकडून व्याज जमा करण्यास सुरुवात, पीएफ पासबुक कसं डाऊनलोड करायचं?
दोन दिवसांपूर्वी अधिवेशनात सक्रीय; अजित पवारांचे PRO संजय देशमुख यांचं निधन, अनेकांना धक्का
दोन दिवसांपूर्वी अधिवेशनात सक्रीय; अजित पवारांचे PRO संजय देशमुख यांचं निधन, अनेकांना धक्का
India Oil Import : अमेरिकेकडून वारंवार इशारे, भारताकडून जूनमध्ये रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, ट्रम्प प्रशासन काय करणार?
अमेरिकेचा दोन दिवसांपूर्वी इशारा अन् जून महिन्याची आकडेवारी समोर, भारताकडून रशियाकडून विक्रमी तेल खरेदी
ही तर शिक्षाच... दारुवरील करवाढीविरोधात आंदोलन; HRAWI कडून महाराष्ट्रात 14 जुलैला बार अन रेस्टॉरंट बंद
ही तर शिक्षाच... दारुवरील करवाढीविरोधात आंदोलन; HRAWI कडून महाराष्ट्रात 14 जुलैला बार अन रेस्टॉरंट बंद
Fact Check : 500 रुपयांची नोट बंद होणार असल्याबाबतचा मेसेज व्हायरल, पीआयबीकडून फॅक्ट चेक, जाणून घ्या सत्य 
500 रुपयांची नोट बंद होणार असल्याबाबतचा मेसेज व्हायरल, पीआयबीकडून फॅक्ट चेक, जाणून घ्या सत्य 
Embed widget