मुंबई, पुण्यात ठाकरेंना तर रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला दणका, अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवत आज मुंबई, पुणे येथील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवत आज मुंबई, पुणे येथील शिवसेना ठाकरे गटाच्या आणि रायगड येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रायगड येथील आगरी कोळी समाजाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
बारामतीच्या जिल्हाप्रमुख कल्पना थोरवे यांचाही प्रवेश
प्रवेश करणाऱ्यांमध्ये उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि बारामतीच्या जिल्हाप्रमुख कल्पना थोरवे, विधी विभागाचे प्रमुख संभाजी थोरवे, पुणे उप-शहरप्रमुख नितीन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आगरी कोळी समाजाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोहर ठाकूर, उरणचे अँडव्होकेट योगशे बापर्डेकर यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
उबाठा गटाच्या दैनंदिनीची निर्मिती करणारे साकेत पवार यांच्या टीमचा शिवसेनेत प्रवेश
उबाठा गटाच्या दैनंदिनीची निर्मिती करणारे साकेत पवार आणि त्यांच्या टीममधील त्यांचे सहकारी स्वप्नील माने, सुनील जाधव, रुपेश सुर्वे यांनीही आज मूळ शिवसेनेत प्रवेश घेतला. तसेच मानव आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य नयन सिंग, महेश शर्मा, संजय सोलंकी, जगदिश कुमावत, सुरेश चौधरी, प्रवीण चौधरी, सिताराम चौधरी, दिनेश चौधरी, नरेश प्रजापती, राजेंद्र मुळे, संजय देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी देखील शिवसेनेमध्ये दाखल झाले. यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेनेचे माजी नगरसेवक पांडुरंग पाटील, प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते.
शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक नेते पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळं राज्यातील काही भागात ठाकरेंची ताकद कमी होताना दिसत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देखील रायगडमध्ये धक्का बसला आहे. शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा कल वाढलेला दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

