आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपणार नाही शिवसेनेचा दरारा, विजयी जल्लोष सुरुच राहणार : संजय राऊत
ले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही शिवसेनेचा (Shiv Sena) दरारा असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.

Sanjay Raut : आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही शिवसेनेचा (Shiv Sena) दरारा असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. बॉम्बे हॉस्पिटलमधील ( Bombay Hospital) कर्मचाऱ्यांची (Workers) मागील काही दिवसांपासून रखडलेली पगारवाढ ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या पाठपुरावाने झाली आहे. त्यानिमित्त आज मोठा जल्लोष शिवसेना ठाकरे गट आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने बॉम्बे हॉस्पिटल परिसरात करण्यात येत आहे. यावेळी राऊत बोलत होते. असेल विजयी जल्लोष करतच राहायचे आहेत. शिवसेनेत असे विजय जल्लोष पुढे होत राहणार असल्याचं राऊत म्हणाले.
कामगार क्षेत्राचं मॅनेजमेंट कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे बॉम्बे हॉस्पिटलचं
मुंबई रुग्णालयच्या मॅनेजमेंटशी अत्यंत जिव्हाळ्याचा नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनचे हे नाते आहे. कामगार क्षेत्राचं मॅनेजमेंट कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे बॉम्बे हॉस्पिटलचं हे युनिट असल्याचे संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे रुग्णलयात सुद्धा कामगार सेना असली पाहिजे. मात्र, या रुग्णलयात कामगार सेनेने पाऊल टाकताना जपून टाकावं लागत असेही राऊत म्हणाले. उपनेता संजय सावंत याने मागील 37 वर्ष जपून पाऊल टाकून हे काम केलं आहे. अनेक जणांनी घुसण्याचा येथे प्रयत्न केला, पण आपला नेता खंबीर होता असे राऊत म्हणाले. आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही शिवसेनेचा दरारा असे राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
























