BMC Election 2022: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची टॅगलाईन ठरली!
BMC Election 2022: मुंबईत महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना तयारीला लागली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची टॅग लाईन ठरली आहे.
BMC Election 2022: मुंबईत महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना तयारीला लागली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची टॅग लाईन ठरली आहे. मुंबईत अनेक विकास कामांना या काही महिन्यांपासून जोर आल्याचे दिसत आहेत. त्यातच विविध मुंबईतील विकास काम घेऊन 'पुढे चला मुंबई' असा शिवसेनेचा नवा नारा असणार असल्याची माहिती मिळत आहे.
मोजक्या शब्दांत मोठा अर्थ साधणाऱ्या 'टॅगलाइन'
निवडणूक प्रचारात सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. बदलत्या प्रचारतंत्राचा वापर करत 'टॅगलाइन'च्या माध्यमातून आपली ओळख ठसवण्याचा प्रयत्न करताना पक्ष दिसतात. मोजक्या शब्दांत मोठा अर्थ साधणाऱ्या 'टॅगलाइन' मतदारांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे या 'टॅगलाइन'च्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यातच आता आगामी निवडणूकांसाठी सगळेच पक्ष अशा टॅगलाईन बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यातच शिवसेनेची प्रचार लाईन ठरली असल्याची माहिती मिळत आहे.
या टॅगलाईनचा किती फायदा?
मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेनं 'करून दाखवलं' हे घोषवाक्य वापरून आक्रमक प्रचार केला होता. या प्रचाराचा शिवसेनेला प्रचंड फायदा झाला होता. त्यामुळे आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी शिवसेनेची रणनीती ठरायला सुरुवात झाली आहे. त्यातच गेल्या निवडणुकीप्रमाणे आता शिवसेनेची पुढे चला मुंबई... ही टॅगलाईन आता टीम अदित्य ठाकरे युवासेना आणि शिवसेनेकडून ठरली आहे. त्यामुळे येणाऱ्या इलेक्शनमध्ये शिवसेनेला या टॅगलाईनचा किती फायदा होतो? हे पुढील काळात पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मुंबईत कामाचा सपाटा
आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही फार प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष हा कामाला लागलेला आहे .त्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने ही कंबर कसली आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत अनेक लोकोपयोगी कामांचं शुभारंभ या काही महिन्यात केला आहे . तर दुसरीकडे मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपल्या प्रत्येक वॉर्ड मध्ये नवीन नवीन संकल्पना राबवत , आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार गार्डन्स, विविध ठिकाणी सुशोभीकरण आणि अनेक प्रकारच्या सुविधा केंद्र हे उभारलेले आहेत. एकंदरीत मुंबईत अनेक प्रकारची काम करण्यास शिवसेनेने आता जोर धरल्याचे दिसत आहे. त्यामध्ये मुंबई वंडरलँड, धारावी सुविधा केंद्र, सी व्ह्यू स्पॉट अशा अनेक नवीन संकल्पना राबवल्या आहेत.
- हे देखील वाचा-
- Aurangabad : चंद्रकांतदादा, उचलली जीभ लावली टाळ्याला असं करु नका, अजित पवारांचा हल्लाबोल
- Nitesh Rane : योग्य वेळी बोलून टीका करणाऱ्यांचा बीपी वाढवेन, जामीन मिळाल्यानतंर नितेश राणेंची प्रतिक्रिया
- Municipal Corporation Election: आगामी 10 महानगरपालिकेच्या निवडणुका राज्य सरकार पुढे ढकलण्याच्या तयारीत...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha