Nitesh Rane : योग्य वेळी बोलून टीका करणाऱ्यांचा बीपी वाढवेन, जामीन मिळाल्यानतंर नितेश राणेंची प्रतिक्रिया
माझे कार्यकर्ते, सहकारी यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. कुटुंबासोबत व वकिलांशी चर्चा करून शरण आलो, मला अटक केलेली नाही, असे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.
मुंबई : मला कोणीही अटक करू शकले नाही. माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून मी कुटुंबिय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः शरण झालो, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडीत दिली. थोडे दिवस आता आराम करणार आहे. त्यानंतर मुंबईत पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेकांना 'ब्लड प्रेशर' चा त्रास होईल हे मात्र निश्चित आहे, असाही टोला त्यांनी लगावला. विरोधकांकडून सुरु असलेले राजकारण अत्यंत खालच्या पद्धतीचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात आणलं गेलं जिल्हा रुग्णालयात सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी त्यांना सावंतवाडी या ठिकाणी असणाऱ्या जेलमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणलं होतं. नितेश राणेंना सावंतवाडी जिल्ह्यात आणत असताना कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा पोलिसांच्या गाडीमागे होता. वीस मिनिटाच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर नितेश राणे सावंतवाडी कारागृहाबाहेर आले त्यांनी प्रतिक्रिया दिली.
नितेश राणे म्हणाले, राजकारण खालच्या पातळीला चालले आहे. आजारपणामध्ये अनेक राजकारण करत होते .आम्ही ही आजारपणात राजकारण करू शकलो असतो . यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया संपल्यानंतर मी जेव्हा बोलेल तेव्हा अनेकांची बीपी वाढायला सुरुवात होईल.
पुढील दोन दिवस ते रुग्णालयांमध्ये उपचार घेतील आणि नंतर गोवा प्रचारात सहभागी होऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबईहून सक्रिय होतील अशी माहिती नितेश राणे यांनी दिली. माझ्या आजारपणावरुन राजकीय आजार असल्याची टीका केली गेली असंही नितेश राणेंनी म्हटलंय. अधिवेशन सुरु होतानाच मुख्यमंत्री आजारी कसे पडतात? असा सवालही नितेश राणेंनी केला आहे.
संबंधित बातम्या :