शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर लिंबू फिरवला; भरत गोगावलेंचं वक्तव्य
Bharat Gogavle : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कुठं लिंबू फिरवला आणि कुठल्या भक्ताकडे गेले माहीत नाही, असं वक्तव्य शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलंय.
रायगड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कुठं लिंबू फिरवला आणि कुठल्या भक्ताकडे गेले माहीत नाही, असं वक्तव्य शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले ( Bharat Gogavle) यांनी केलंय. ते रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना भरत गोगावले यांनी हे वक्तव्य केलंय. भाजपसोबत युती करून सत्ता चालवू असे सांगितले असते तर आम्ही पाच पावलं मागे आलो असतो. पण शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कुठं लिंबू फिरवला आणि कुठल्या भक्ताकडे गेले माहीत नाही, असे गोगावले यांनी म्हटलं आहे.
गेल्या अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेने राष्ट्रवादी काँगेस आणि काँग्रेस सोबत आघाडी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. परंतु, शिवसेनेच्या आमदारांना मिळणाऱ्या दुजाभावामुळे त्यांनी वारंवार यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. परंतु, उद्धव ठाकरे यांनी ही तक्रार न एकल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केले. यावरून भरत गोगावले यांनी शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य केलंय.
दरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने भरत गोगावले नाराज असल्याचे बोलले जात आहे. परंतु, आपण नाराज नसल्याचे स्पष्टीकरणही गोगावले यांनी दिले आहे. राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. परंतु, या मंत्रिमंडळ विस्तारात रायगडच्या एकाही आमदाराला स्थान मिळू शकले नाही. त्यामुळे रायगडात नाराजीचा सूर होता. परंतु, गोगावले यांनी कालच याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
jalgaon : माझा तिसरा डोळा उघडला तर...; गुलाबराव पाटलांचा विरोधकांना इशारा
काहींना शिवसेना उघड्यावर पडली आहे असं वाटतं, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला