एक्स्प्लोर

तुम्ही पुन्हा सोबत या, रामदास आठवलेंची शिवसेनेला साद

Ramdas Athawale on MVA govt : रामदास आठवले यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेला पुन्हा एकदा साद घातली.

Ramdas Athawale on Shivsena :  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पुन्हा एकदा साद घातली आहे. शिवसेनेने आपला निर्णय बदलावा. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. त्यासाठी भाजप शिवसेना आणि आरपीआय एकत्र असले पाहिजेत असे आठवले यांनी म्हटले. रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर भर दिला. 

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले हे सांगली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अडीच वर्षाचा जो फॉर्म्युला होता त्यावर पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे एकमत व्हायला काही हरकत नाही. अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यावं असेही रामदास आठवले यांनी म्हटले. अजूनही भाजप आणि शिवसेना यांचे सरकार स्थापन होऊ शकतं असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. 

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून देखील आठवले यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून एसटी कामगारांवर अन्याय होत आहे. राज्य  सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे. मात्र, एसटी कर्मचारी राज्य शासनामध्ये महामंडळाचे विलीनीकरण करावे या मागणीवर ठाम आहेत. विलीनीकरणाच्या निर्णयासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल हा विलीनीकरणाच्या बाजूने येण्याची शक्यता असल्याचे भाकित आठवले यांनी वर्तवले.

महाविकास आघाडी सरकार जावे

रामदास आठवले यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक विषयावरून वाद आहेत. हा विकास आघाडीमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचारा संबंधी आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी चौकशीदेखील सुरू आहेत. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राच्या सत्तेत राहणे योग्य नाही, असेही आठवले म्हणाले. 

नारायण राणे यांच्या वक्तव्यावर आठवले म्हणतात..

मार्च महिन्यामध्ये  महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते. त्यांच्या या दाव्यावर बोलताना आठवले यांनी आम्हीदेखील सरकार पडणार असल्याची वाट पाहत असल्याची मिश्किल टिप्पणी केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget