Sanjay Raut : आमच्याशी पंगा घेऊ नका, हनुमान चालिसावरुन राऊत संतापले, म्हणाले कालची भाडोत्री...
Sanjay Raut : रामाचे धनुष्यबान आणि हनुमानाची गदा आमच्याजवळ आहे. आमच्या सोबत लढाई करू नका. लढाई करायची आहे, तर लडाखच्या सीमेवर जाऊन लढा
Sanjay Raut : मुंबईत मोठा राडा सुरू आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला गेले हाच सर्वात मोठा विनोद आहे. ज्या शिवसेनेचा जन्म हिंदुत्वसाठी झाला, त्या शिवसेनेला ही कालची पोरं हिंदुत्वाचा पाठ शिकवणार का? हे भाडोत्री लोक आहेत. भाजपच्या नेत्यांना काही काम नाही. हे लोक केंद्रातील महागाईवर बोलणार नाहीत, अशी टीका करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते नागपुरात दिपटी सिग्नल येथील पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.
देशातील तरुण बेरोजगार झाले आहेत. मात्र त्यावर बोलायला कोणी तयार नाही, मुंबईत काही लोक राडा करत आहे. मुंबईत जाऊन हनुमान चालीसा वाचतात, अमरावतीवाले फिल्मी सी ग्रेड वाले हे लोक आहेत, आम्हाला हनुमान चालिसा शिकवणार का? अशी टीका करत भाजप आणि राणा दाम्पत्यावर हल्ला चढवला. शिवसेनेसोबत पंगा घेऊ नका खूप महागात पडणार, काही लोक नागपूरला स्वतःची जहागीर समजतात. नागपूर फक्त आमचे आहे असे म्हणणाऱ्याना सांगू इच्छितो ते स्वप्न विसरा. यानंतर महापालिकेची, विधानसभेची निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक असो नागपूरचा इतिहास लिहताना शिवसेनेचे नाव लिहले जाईल, असेही संजय राऊत म्हणाले.
हनुमान चालीसा नक्की वाचा, श्रद्धेचा विषय आहे. बजरंगबली हनुमान, प्रभू श्रीराम हे आमचे सध्याचे स्थान आहे. जेव्हा युध्दात हजारो शिवसैनिक आयोध्याच्या लढ्यात सामील झाले होते, त्यावेळी बाकीचे कुठे गेले होते. अनेकजण शिवसैनिक सैनिक शहीद झाले होते. त्याच्याशी आमचा काही संबंध नाही असे अनेक नेते म्हणाले, तेव्हा बाळासाहेब ठाकरे देशात एकच नेता होता, ज्यांनी सांगितलं हे काम जर का माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. आता हे लोक(भाजप, राणा दमपत्य) आम्हाला हनुमान चालीसेचा पाठ शिकवायला निघाले. रामाचे धनुष्यबान आणि हनुमानाची गदा आमच्याजवळ आहे. आमच्या सोबत लढाई करू नका. लढाई करायची आहे, तर लडाखच्या सीमेवर जाऊन लढा, तिथे का शेपूट घालून बसतात आणि इथे मुंबईत येऊन हनुमान चालीसा वाचतात, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या: