Bogus Doctor : हिंगोलीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश, तीन क्लिनिकवर आरोग्य प्रशासनाची कारवाई
हिंगोलीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. हे बोगस डॉक्टर वैद्यकीय कोणतेही शिक्षण नसताना रुग्णांची तपासणी करुन उपचार करत असल्याचे दिसून आले.
![Bogus Doctor : हिंगोलीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश, तीन क्लिनिकवर आरोग्य प्रशासनाची कारवाई Bogus doctors exposed in Hingoli, health administration takes action on three clinics Bogus Doctor : हिंगोलीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश, तीन क्लिनिकवर आरोग्य प्रशासनाची कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/16/374f76ea40eba8717ba57612b5d886c3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हिंगोली : हिंगोलीतल्या वसमत तालुक्यामध्ये बोगस डॉक्टरांनी हैदोस घातला आहे. अनेक बोगस डॉक्टर वैद्यकीय कोणतीही पदवी नसताना सर्रास राजरोसपणे रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
या बोगस डॉक्टरांची माहिती आरोग्य प्रशासनाने मिळताच आरोग्य विभागाच्या वतीने काल (15 मार्च) वसमत तालुक्यातील वेगवेगळ्या गावात सुरु असलेल्या तीन बोगस बंगाली डॉक्टरांच्या क्लिनिकवर छापा टाकण्यात आला आहे. यामध्ये वेगवेगळ्या गावातील तिन्ही ठिकाणी असलेल्या क्लिनिकची तपासणी करण्यात आली. या तिघांकडे कोणती कागदपत्रे आहेत त्याची सुद्धा आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली. परंतु कोणतीही कागदोपत्री नोंद नसलेले हे मुन्नाभाई रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून आलं आहे.
हे बोगस डॉक्टर वैद्यकीय कोणतेही शिक्षण नसताना रुग्णांची तपासणी करुन उपचार करत असल्याचे दिसून आले आहे. या मुन्नाभाईंवर कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे
वसई-विरारमध्येही बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
वसई विरारमध्ये बोगस डॉक्टरांची प्रकरणं एका मागून एक समोर आली होती. मसाला विक्री करणारा चक्क तीन वर्ष वसईत अस्थिरोगतज्ञ म्हणून आपला दवाखाना थाटून प्रॅक्टिस करत असल्याचं समोर आलं होतं. वसई-विरार महानगरपालिकेच्या माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी सुनील वाडकरला बेड्या ठोकण्यात आल्या. सुनील वाडकरकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नव्हती. तरीही या महाशयाने बोगस प्रमाणपत्राच्या आधारे आपण एमबीबीएस असल्याचं भासवून विरार फाटा येथे एक मोठं हॉस्पिटल उभारलं होतं.
तर मसाल्यांची विक्री करणारा हेमंत पाटील उर्फ सोनावणे याने 2018 साली विरारमध्ये पॅरेडाईज इमारतीत अस्थिरोगतज्ञाचा दवाखाना थाटला होता. त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारची डॉक्टरकीची पदवी नव्हती. तसेच त्याने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल तसेच वैद्यकीय अधिनियम 1961 अन्वये पात्र वैद्यकीय प्रमाणपत्र आणि रजिस्टेशन क्रमांक न घेताच हा अस्थिरोगतज्ञाच दवाखान चालवत होता. बोगस डॉक्टर बनून तो लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करत होता.
संबंधित बातम्या
बोगस डिग्रीप्रकरणी वसई-विरार पालिकेच्या माजी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला बेड्या
मसाले विक्री करणारा बनला होता अस्थिरोगतज्ञ, वसईत बोगस डॉक्टरांची मालिका सुरुच
बोगस डॉक्टर सुनिल वाडकरची पत्नीही उचापतखोर; रुग्णालयात चालवायची गर्भपात केंद्र
ठाण्याच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये उपचार करणारे डॉक्टर अप्रशिक्षित, 3 डॉक्टरांना पकडले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)