एक्स्प्लोर

MLA Disqualification: आमदार अपात्रता निकालासाठी उरले 49 तास, राहुल नार्वेकरांकडे काय आणि किती पर्याय?

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणी काय निकाल देणार? त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे. 

मुंबईएकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde)  जून 2022 मध्ये  बंडखोरी केली आणि भाजपसोबत (BJP)  सत्तेत सहभागी होत मुख्यमंत्री झाले. शिंदेंच्या बडानंतर उद्धव  ठाकरेंनी (Uddhav Thackeray)  सुप्रीम कोर्टात  (Supreme Court) धाव घेत याचिका  दाखल केली.  सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निकाल देण्याचे आदेश दिले. त्यानंतर या संदर्भात अध्यक्षांसमोर सुनावणी झाली. सादर झालेले पुरावे, कागदपत्रं, नोंदवलेल्या साक्षी असा प्रवास करत अखेरीस शिवसेनेच्या दोन गटांमधील शिंदे गट की ठाकरे गट अपात्र (MLA Disqualification)  ठरणार? याची तारीख जवळ येऊन ठेपली आहे. दोन्ही गटांकडून निकालाच्या बाजूने दावे केले जात आहेत. राहुल नार्वेकर तयार आहेत दोन्ही गट सज्ज झालेत..  काऊंटडाऊनही सुरू झालंय. आता प्रतीक्षा  विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)  काय निकाल देणार? त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे. 

पुढच्या दोनच दिवसांत हे स्पष्ट होणार आहे की, मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरतील का? आणि जर ते अपात्र झाले, तर राज्य सरकारचं अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे जर पात्र ठरले तर उद्धव ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील का? किंवा यापेक्षा वेगळा निकाल लागेल का? अशा अनेक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.

 राहुल नार्वेकरांसमोर काय आहे पर्याय? (Rahul Narvekar) 

 सध्याच्या परिस्थितीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे ठाकरे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचा पर्याय आहे  तर दुसरा पर्याय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं.  किंवा मग कोणत्याही गटाच्या बाजूने निकाल देण्याऐवजी राहुल नार्वेकर स्वत:च विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशीही शक्यता वर्तवली जातेय. नाहीतर राहुल नार्वेकर तटस्थ निकाल देऊन, कोणत्याही गटाला अपात्र ठरवणार नाही.  या फक्त शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. 

राहुल नार्वेकर-मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी (7 जानेवारी 2024) वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. दोघांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र 10 जानेवारीला नार्वेकर आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल देणार असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. आपआपली केस अधिक मजबूत करण्यासाठी त्यानुसार दोन्ही गटाच्या आमदारांनी साक्ष दिली. यानंतर उलट तपासणी दरम्यानह आपली भूमिका कायद्याला धरून होती हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार? त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे. 

राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी करण्यास सांगितले आहे. ज्यामुळे देशाच्या इतिहासात या घटनेकडे ऐतिहासिक राजकीय घटना म्हणून पाहिले जात आहे.  त्यामुळे पुढील काही तासांत अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप आणणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

JP Nadda On Mallikarjun Kharge : भाजप अध्यक्ष नड्डांचं मल्लिकार्जुन खरगेंच्या पत्राला प्रत्युत्तरSanjay Raut One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा आश्चर्यकारक, राऊतांचं टीकस्त्रMVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणारMVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget