Shiv Sena Maharashtra MLA Disqualification Case Verdict LIVE Updates : शिंदेंचे आमदारही पात्र, ठाकरेंचे आमदारही पात्रच; विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

Shiv Sena Maharahtra MLA Disqualification Case Verdict LIVE Updates: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्ष जाहीर करणार आहेत.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 10 Jan 2024 07:57 PM
Ujjwal Nikam On MLA Disqualification Verdict : अपात्रतेचा निकाल 3 मुद्द्यांवर आधारित : उज्ज्वल निकम

Amdar Apatra Nikal LIVE: मालेगाव : मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयासमोर शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष

Aamdar Apatrata Nikal LIVE Updates: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला राज्यभरातून शिवसैनिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून मालेगावात पालकमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयासमोर शिंदे गट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोसम पुल चौकात फटाक्यांची आतशबाजी करत पेढे वाटप करून आंदोत्सव साजरा केला.

Bharat Gogawale on MLA Disqualification : Whip मान्य झाल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया

Shrikant Shinde : अफजलखानाचा कोथळा दोनदा बाहेर काढला, एकदा शिवरायांनी...दुसऱ्यांदा...

Sanjay Gaikwad on MLA Disqualification Case: अध्यक्षांनी आमच्यावर अन्याय केला, त्या विरोधात आम्ही न्यायिक मार्गानं न्याय मागणार : संजय गायकवाड

Sanjay Gaikwad on MLA Disqualification Case LIVE: संजय गायकवाड म्हणाले की, "जर आमच्या गटाचे आमदार हे अपात्र नाहीत तर मग ठाकरे गटाचे आमदार पात्र कसे कारण एक जर चुकला नसेल तर दुसरा नक्कीच चुकला असेल आणि त्यामुळे अध्यक्षांनी दिलेला न्याय हा आमच्यावर जरी चांगला असला तरी हा अन्याय आहे . कारण आम्हाला जरी न्याय मिळाला असला तरी हा आमच्यावर अन्याय असल्यासारखा आहे कारण ठाकरे गटाचे आमदार हे पात्र होऊच शकत नाही आणि त्यामुळे अध्यक्षांनी आमच्यावर एक प्रकारे अन्याय केला आहे आणि आम्ही सनदशीररित्या याबाबतीत पुढील न्यायीक मार्गाने न्याय मागू."

Rahul Narwekar on MLA Disqualification Case: ठाकरे गटाकडून धुळ्यात आंदोलन, शिवसैनिकांनी काळे झेंडे फडकावले

Rahul Narwekar on MLA Disqualification Case: आमदार अपात्रता प्रकरणाचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा उद्धव ठाकरे गटाने निषेध व्यक्त केला असून काळे झेंडे फडकवत उद्धव ठाकरे गटाने धुळ्यात आंदोलन केले. 


संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल जाहीर करण्यात आला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल जाहीर करीत खरी शिवसेना शिंदे गटाचीच असल्याचे जाहीर केले, या निकालाचे संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटत असून उद्धव ठाकरे गटाने या निकालाचा निषेध व्यक्त केला आहे हा निकाल जाहीर करून विधानसभा अध्यक्षांनी लोकशाहीचा खून केल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाने व्यक्त केली आहे, धुळ्यात उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे फडकवत या निकालाचा निषेध व्यक्त केला. धुळ्यात शिवसेना कार्यालया जवळ हे आंदोलन करण्यात आले. 

MLA Disqualification Case : सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; शरद पवारांचे मुद्दावर बोट

Shiv Sena MLA Disqualification Case :   शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाच्याविरोधात जाऊन निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राजकीय संघटनेला महत्त्व दिले तर विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिले असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टात  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जावे लागेल. त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळेल अशी खात्री वाटत असल्याचेही पवार यांनी म्हटले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी शिवसेना कोणाची आहे, हे लोकांना माहीत आहे. आजच्या निकालानंतर मशाल मोकळी झाली असल्याचे सूचक वक्तव्य पवारांनी केले.  


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Eknath Shinde : आजच्या निकालामुळे घराणेशाही मोडीत निघाली, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. आजच्या निर्णयामुळे घराणेशाही मोडीत निघाल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. पक्ष कोणाचीही खासगी मालमत्ता नसते असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. 


वाचा सविस्तर 

Sushma Andhare : "डाव तुमच्या हातात दिला तरी तुम्हाला जिंकता येत नाही"; सुषमा अंधारेंचा टोला

MLA Disqualification Case Sushma Andhare मुंबई : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस असून संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींकडे लागले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  


सविस्तर वृत्त येथे वाचा 

Uddhav Thackeray : स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्ष कसा बदलावा हे सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Shiv Sena MLAs Disqualification : शिंदेंची शिवसेना ही त्यांची कधीच होऊ शकत नाही, त्यांचा आणि शिवसेनेचा संबंध कधीच संपला आहे, त्यामुळे शिवसेना ही आमचीच आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्ष कसा बदलावा हे सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले असं सांगत त्यांनी नार्वेकरांवरही आरोप केले. 


सविस्तर वृत्त येथे वाचा 

Sanjay Raut : 'औकात क्या है तुम्हारी' आजचा निकाल हा कोणताही निर्णय नाही, हे षडयंत्र, संजय राऊतांचा घणाघाती वार

मुंबई : विधानसभा अध्यक्षांना इतिहास रचण्याची संधी मिळाली होती. पण त्यांनी ती संधी गमावली असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिलीये. आजचा निकाल हा कोणताही निर्णय नाही, हे षडयंत्र आहे. ज्या व्यक्तीने हा निर्णय दिला त्या व्यक्तीने देखील उद्धव ठाकरे यांच्या पाठित खंजीर खुपसलाय, असं म्हणत राऊतांनी राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला. 


वाचा सविस्तर 

MLA Disqualification Case : घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या संख्येने शिवसैनिक जमायला सुरुवात

MLA Disqualification Case : घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या संख्येने शिवसैनिक जमायला सुरुवात


काळी फित आणि काळे झेंडे घेऊन नार्वेकर यांचा निषेद करण्यास उतरणार

Bharat Gogawale on MLA Disqualification Case: 14 आमदार अपात्र झाले नाही त्यामुळे थोडी खंत : भरत गोगावले

Bharat Gogawale on MLA Disqualification Case: 14 आमदार अपात्र झाले नाही त्यामुळे थोडी खंत आहे, असं भरत गोगावले म्हणाले आहेत. 


14 आमदार अपात्र झाले नाही त्यामुळे थोडी खंत आहे, ती अपेक्षा होती ते झालं असतं तर जास्त आनंद झाला असता, आता आमचा व्हीप त्यांना लागू होणार व्हीपच पालन केलं नाही तर काय करायचं हे मुख्यमंत्र्यांशी बोलून केलं जाईल, ठाकरेंचे आमदार सामावून घ्यायचे का यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत, असं शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले म्हणाले आहेत. 

Supriya Sule on Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: खोदा पहाड आणि निकला चुहा, असाच आजचा निकाल : सुप्रिया सुळे


Supriya Sule on Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: खोदा पहाड आणि निकला चुहा असा आजचा निकाल आहे. सगळेच पत्र आहेत मग लढाई कशासाठी. संविधानाची हत्या केली आहे. जर अपात्र करायचं नव्हतं तर मग केस केली कशाला, महाराष्ट्राचा जनतेला हे सरकार मान्य नाही. आजचा विजय हा उद्धव ठाकरेंचाच आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 



उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र केले असते, तर नाचक्की झाली असती म्हणून त्यांनी पात्र केलं का? असा सवाल आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

Shiv Sena : सत्तासंघर्षाच्या लढाईत शिंदेच वरचढ! आधी निवडणूक आयोग, नंतर न्यायालय आणि आता विधानसभा; थेट लढतीत एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर तिसऱ्यांदा मात

Shiv Sena MLAs Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर झाला असून विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. बहमताच्या आधारे शिदेंचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) दिला. तसेच ठाकरे गटाचे आमदार पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्र ठरवण्यात आले आहेत. शिवसेनेतील बंडानंतर आतापर्यंतच्या प्रत्येक लढाईत एकनाथ शिंदे हेच वरचढ ठरले असून त्यांनी तिसऱ्यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मात केल्याचं दिसून आलं.


वाचा सविस्तर 

MLA Disqualification Case: शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून भंडाऱ्यात विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा निषेध

MLA Disqualification Case: शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातला निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. यावेळी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचा भंडाऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं निषेध नोंदविण्यात आला. उबाठाचे असंख्य पदाधिकारी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात एकत्र येत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी करीत शिंदे गटाचाही निषेध नोंदविला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राहुल नार्वेकरांच्या बॅनरला जोडे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी समयसूचकता दाखवीत कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चौक बंदोबस्त तैनात करण्यात आला.

MLA Disqualification Case: रत्नागिरीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर रत्नागिरी शहरांमध्ये देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याच्या उद्योगमंत्री असलेल्या उदय सामंत यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिक एकत्र आले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नावाचा जयघोष करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले.

Yogesh Kadam on MLA Disqualification Case: नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाचा बीडमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून निषेध

MLA Disqualification Case: शिवसेना पक्षा संदर्भात मिलिंद नार्वेकरांनी जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या विरोधात बीडमध्ये उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असून बीड शहरामध्ये नार्वेकर यांच्या फोटोला जोडे मारून शिवसैनिकांनी आंदोलन केलं तर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची हा जो निर्णय आला आहे या निर्णयाचा शिवसैनिकांनी निषेध केला असून भाजप सरकारच्या विरोधात देखील तीव्र घोषणाबाजी केली..नार्वेकरांनी संविधानाची पायमल्ली केली असून घटनेच्या विरोधात निकाल दिलं असल्याचं शिवसैनिक म्हणाले आहेत


अगोदर एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरला त्यानंतर पक्षाचे चिन्ह चोरलं आणि आज नार्वेकरांनी जो निर्णय दिला आहे तो निर्णय ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मान्य नसून 2024 च्या निवडणुकीत जनतेच्या न्यायालयातच शिंदेचा निकाल लावू असा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिला आहे.

 
Aamdar Apatrata Nikal LIVE Updates: ठाकरे गटाचे कोणते आमदार पात्र?

Aamdar Apatrata Nikal LIVE Updates: ठाकरे गटाचे कोणते आमदार पात्र? 



  1. अजय चौधरी

  2. रवींद्र वायकर

  3. राजन साळवी

  4. वैभव नाईक

  5. नितीन देशमुख

  6. सुनिल राऊत

  7. सुनिल प्रभू

  8. भास्कर जाधव

  9. रमेश कोरगावंकर

  10. प्रकाश फातर्फेकर

  11. कैलास पाटिल

  12. संजय पोतनीस

  13. उदयसिंह राजपूत

  14. राहुल पाटील

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: शिंदे गटाचे कोणते आमदार पात्र? पाहा संपूर्ण यादी

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: शिंदे गटाचे कोणते आमदार पात्र? 



  1. एकनाथ शिंदे

  2. चिमणराव पाटील

  3. अब्दुल सत्तार

  4. तानाजी सावंत

  5. यामिनी जाधव

  6. संदीपान  भुमरे

  7. भरत गोगावले

  8. संजय शिरसाठ

  9. लता सोनवणे

  10. प्रकाश सुर्वे

  11. बालाजी किणीकर

  12. बालाजी कल्याणकर

  13. अनिल बाबर

  14. संजय रायमूळकर

  15. रमेश बोरनारे

  16. महेश शिंदे

Rahul Narwekar On MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दीड वर्षानी जाहीर

Rahul Narwekar On MLA Disqualification Case : मुंबई : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (Shiv Sena MLA disqualification Final Result ) अखेर जवळपास दीड वर्षानंतर अंतिम निकाल जाहीर झाला. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी जवळपास दीड तास निकालाचं वाचन केलं. त्यानुसार, ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. मात्र खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनाच व्हिप म्हणून मान्यता आहे. ठाकरे गटाचे सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांचा व्हिप अमान्य. महत्त्वाचं म्हणजे राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची 2018 ची घटनादुरुस्ती अमान्य करत, उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्तीच अवैध ठरवली. त्याशिवाय उद्धव ठाकरे हे केवळ पक्षप्रमुख म्हणून कोणालाही मनमर्जीने हटवू शकत नाहीत. एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकत नाहीत. त्यासाठी कार्यकारिणीची मंजुरी आवश्यक होती, असं राहुल नार्वेकर म्हणाले. आमदार अपात्र करण्याबाबत दोन्ही गटांनी केलेल्या याचिका फेटाळत, राहुल नार्वेकर यांनी कोणालाही अपात्र ठरवलं नाही.

Aaditya Thackeray on MLA Disqualification Case: यापुढे कायदेशीर लढाई लढणार; आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले

Aaditya Thackeray on MLA Disqualification Case: यापुढे कायदेशीर लढाई लढणार असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. लोकशाहीत जनताच खोके सरकारची उलट तपासणी करेल असं आदित्य ठाकरे म्हणाले. २०२४ मध्ये भाजपला संविधान बदलायचं आहे हे संकेत आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलीय. 

Maharashtra Politicle Updates: विधासभा अध्यक्षांच्या ऐतिहासिक निर्णयानंतर शिंदे गटाकडून मोठा जल्लोष

Maharashtra Politicle Updates: विधासभा अध्यक्षांच्या ऐतिहासिक निर्णयानंतर शिंदे गटाकडून मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला..ठिकठिकाणी फटाके फोडत, ढोलताशांचा गजरात शिंदे गटाने मोठा जल्लोष केला तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.

Maharashtra Politicle Updates: विधासभा अध्यक्षांच्या ऐतिहासिक निर्णयानंतर शिंदे गटाकडून मोठ

Maharashtra Politicle Updates: विधासभा अध्यक्षांच्या ऐतिहासिक निर्णयानंतर शिंदे गटाकडून मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला..ठिकठिकाणी फटाके फोडत, ढोलताशांचा गजरात शिंदे गटाने मोठा जल्लोष केला तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.

Dada Bhuse on MLA Disqualification Case: बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय : दादा भुसे

Dada Bhuse on MLA Disqualification Case: प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादानं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय, नार्वेकरांनी कायदा आणि घटनेचे विवेचन करून शिंदेंच्या नेतृत्वाखाली कौल दिला, म्हणून त्यांचे आभार, शिवसेना आमदार अपात्र निकालानंतर मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया.

Sanjay Raut on MLA Disqualification Case: कोण एकनाथ शिंदे, त्यांची औकात काय? : संजय राऊत

Sanjay Raut on MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेच्या निकालानंतर संजय राऊतांनी काढली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची औकात, कोण एकनाथ शिंदे ? त्यांची औकात काय? राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल.


आजचा निकाल हे षडयंत्र आहे असा आरोप करत खासदार राऊत यांनी शिंदे आणि गोगावले यांची औकात काय असा सवालही विचारला. आजचा दिवस हा देशाच्या इतिहासातला काळा दिवस आहे असं राऊत म्हणाले. तर केंद्रीय निवडणूक आयोग चोरांचा सरदार अशी टीका त्यांनी केली. 


पाहा व्हिडीओ : 


MLA Disqualification Case: शिंदे गट अन् ठाकरे गट दोन्ही गटांचे आमदार पात्र; विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन आज पार पडलं. आणि एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत.


दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिलीय. आणि निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच, निकालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केलाय. दरम्यान, निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच, या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

MLA Disqualification Case : गोगावलेंचा व्हिप ते एकनाथ शिंदेंची नियुक्ती, जे जे सुप्रीम कोर्टाकडून अवैध, ते ते नार्वेकरांकडून वैध!

Shiv Sena MLA Disqualification Case :  शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)  यांनी आज निकाल दिला. राहुल नार्वेकर यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना असल्याचा निकाल दिला. नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टी अवैध ठरवल्या, त्याला नार्वेकर यांनी वैध ठरवले. 


विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रात शिवसेना हा पक्ष कोणाचा, यावर निर्णय दिला. यामध्ये पक्षाची घटना, नेतृत्वाची रचना आणि विधिमंडळ पक्ष याचा विचार करण्यात आला. निवडणूक आयोगात असलेली शिवसेनेची घटना ही ग्राह्य धरण्यात आली. शिवसेनेच्या घटनेतील बदल हे निवडणूक आयोगातील घटनेत आढळले नसल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले. 2018 मध्ये पक्ष घटनेत झालेले बदल निवडणूक आयोगाकडे नसल्याचेही विधानसभा अध्यक्षांनी म्हटले. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस, लोकशाहीची हत्या करणारा : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray on MLA Disqualification Case Result: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणी आज निर्णय जाहीर केलाय. "मूळ राजकीय पक्ष संदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी  दिलेला निर्णय  निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीच्या हत्या करणारा आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत. 2024 मध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली तर, खोक्यांचा राजकारण झालं तर अशाच त्यांना वाचवले जाणार आहे. भाजपाला आपलं संविधान बदलायचे आहे.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेले संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला स्वतःच संविधान घ्यायचा आहे ते स्पष्ट झालं.", असं आदित्य ठाकरे म्हणाले. 


"अनेक वर्षे  राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा  ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते ? लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही. लोकशाहीमध्ये खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहे. आम्ही सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेला आहे. असं असताना अशा प्रकारचा निर्णय येतो हे धक्कादायक आहे. जगाला आता कळलेला आहे की आपल्या देशात लोकशाहीला मारलेला आहे आणि देशात  हिटलरशाही सुरू झालेले आहे. या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढली जाईल.", असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

Shiv Sena MLAs Disqualification Verdict : तुम्ही पक्षप्रमुखांच्या निर्णयाने लढलात ना? पक्षप्रमुख अवैध ठरवणाऱ्या राहुल नार्वेकरांना आदित्य ठाकरेंचा सवाल!

Shiv Sena MLAs Disqualification Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर केला. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे. त्यांना पक्षातून काढण्याचा उद्धव ठाकरेंना कोणताही अधिकार नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्याशिवाय एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र होऊ शकत नाहीत, असेही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. राहुल नार्वेकरांच्या या निर्णायाविरोधात ठाकरे गट न्यायालयीन लढाई लढणार आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं. त्याशिवाय माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांचे डोळे पाणावले होते. 


सविस्तर वृत्त फक्त एका क्लिकवर

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: शिंदेंचे आमदारही पात्र आणि ठाकरेंचे आमदारही पात्रच, विधानसभा अध्यक्षांचं मोठं निरिक्षण

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: शिंदेंचे आमदारही पात्र आणि ठाकरेंचे आमदारही पात्रच, विधानसभा अध्यक्षांचं मोठं निरिक्षण, पण शिवसेना पक्ष मात्र एकनाथ शिंदेंचा

MLA Disqualification Case: शिंदे गटाचे आमदार अपात्र नाहीत; विधानसभा अध्यक्षांचा ठाकरेंना आणखी एक धक्का

MLA Disqualification Case:  शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरत नाहीत, बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नाही, असं निरिक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं आहे. 

एकनाथ शिंदेंना पदावरून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाही : राहुल नार्वेकर

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: पक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे. 


पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे. असं झालं तर पक्षाला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही. शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. 


शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाहीत. शिवसेना नेतृत्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगानं दिलेला हा निकाल स्पष्ट आहे, असंही ते म्हणाले आहेत. तसेच,


त्यामुळे बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना होती, भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली निवड ही वैध ठरते, असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. 

Aamdar Apatrata Nikal LIVE Updates: निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटानं सादर केलेल्या दाव्यातही तफावत : विधानसभा अध्यक्ष

Aamdar Apatrata Nikal LIVE Updates: निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटानं सादर केलेल्या दाव्यातही तफावत आहे, एकीकडे ते सांगतात पक्षाची बैठक सेनाभवनात झाली, तर दुसरीकडे सांगतात तीच बैठक ऑनलाईन झाली होती. त्यामुळे त्यांची कागदपत्र संभ्रम निर्माण करणारी आहेत.


"25 जून 2022 ला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्याचा दावा. तसंच या बैठकीत 7 निर्णय घेतल्याचा दावा प्रभू आपल्या ॲफिडेव्हीटमध्ये करतात. पण या बैठकीचे कोणतेही मिनिट्स प्रतिज्ञापत्रात जोडलेले नाहीत. शिवसेनेच्या लेटरहेडवर ते निर्णय घेतल्याचं लिहिलंय पण त्याशिवाय त्यावर कुणाच्याही सह्या नाहीत. 

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification Case: पक्षातील इतर नेत्यांनी घटनेच्या आधारावर नवा नेता पक्षप्रमुख म्हणून निवडला असेल तर त्याचाच दावा घटनेनुसार अधिकृत मानावा लागेल : राहुल नार्वेकर

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification Case: "शिवसेना पक्षप्रमुख हे 2018 साली पद निर्माण करण्यात आल्याचा दावा आहे. पण अगोदर शिवसेना प्रमुख हे प्रमुख पद होते. राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये 19 मधील 14 सदस्य हे प्रतिनिधी सभेतून निवडून येणार होते तर 5 हे शिवसेना प्रमुख नियुक्त होते. 2018 सालच्या पक्षीय रचनेत केलेले बदल हे शिवसेनेच्या घटनेनुसार नाहीत, 2018 सालची पक्षाच्या घटनेतील दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही. पक्षात बंडाळी झाल्यानंतर पक्षप्रमुख या नात्यानं नेता आपला आदेश पक्षाचा आदेश म्हणून वापरू शकतो. पण जर पक्षातील इतर नेत्यांनी घटनेच्या आधारावर नवा नेता पक्षप्रमुख म्हणून निवडला असेल तर त्याचाच दावा घटनेनुसार अधिकृत मानावा लागेल.", असं निरिक्षण राहुल नार्वेकरांनी नोंदवलं आहे. 

Shiv Sena MLA Disqualification Case LIVE : एकनाथ शिंदेंना विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाही : विधानसभा अध्यक्ष

Shiv Sena MLA Disqualification Case LIVE : "पक्षप्रमुखाला थेट कुणालाही पक्षातून काढता येत नाही. एकनाथ शिंदेंना काढण्याचा ठाकरेंना कोणताही अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकरणीसोबत चर्चा करुनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो. शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणालाही पक्षातून काढण्याचे अधिकार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार नाही.", असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

Amdar Apatra Nikal LIVE: शिवसेना कुणाची? याचं उत्तर त्यांच्या पक्ष नेतृत्त्वाच्या निवड पद्धतीवर अवलंबून : विधानसभा अध्यक्ष

Amdar Apatra Nikal LIVE: "22 जून 2022 रोजी विधानसभा अध्यक्ष या नात्यानं माझ्यासमोर आलेले मुद्देही महत्त्वाचे आहेत, शिवसेना कुणाची? याचं उत्तर त्यांच्या पक्ष नेतृत्त्वाच्या निवड पद्धतीवर अवलंबून आहे, साल 2018 मधील नेतृत्त्व निवड ही पक्षाच्या घटनेला धरून होती हे प्रमाण मानायची का? असाही सवाल होता. पक्षप्रमुख की राष्ट्रीय कार्यकारणी प्रमुख महत्त्वाचा मानायचा हा कळीचा मुद्दा होता.", असं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं आहे. 

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: याचिका सहा गटात विभागण्यात आल्यात
गट पहिला :  ठाकरेंच्या शिवसेनेने दाखल केलेल्या 1 ते 16 याचिकांचा समावेश 

पहिल्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या एकूण 16 आमदारांविरोधात ठाकरेंच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिका 

 

दूसरा गट : 17 क्रमांकाची याचिका: तीन अपक्ष आमदारांच्या अपात्रतेसंबंधीची मागणी

बच्चू कडू, नरेंद्र बोंडेकर आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याविरोधातील याचिका 

 

तिसरा गट : अठराव्या क्रमांकाची याचिका 

विधानसभा अध्यक्ष निवडिवेळी ठाकरेंचा व्हीप झुगारला म्हणून शिंदे गटाविरोधात दाखल याचिका

 

चौथा गट : 19 क्रमांकाची याचिका एकूण 39 आमदारांविरोधात ज्यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ठाकरेंचा व्हीप झुगारून एकनाथ शिंदेंच्या बाजूने मतदान केलं म्हणून ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिका

 

पाचवा गट : याचिका क्रमांक 20 ते  22 ; विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगवलेंचा व्हीप झुगारणाऱ्या ठाकरेंच्या आमदारांविरोधात शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिका 

 

सहावा गट : याचिका क्रमांक 23 ते 34; विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगवलेंचा व्हीप झुगारणाऱ्या ठाकरेंच्या आमदारांविरोधात शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिका
Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच : विधानसभा अध्यक्ष

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: "23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे. 21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेत दोन गट पडल्याचं 22 जून रोजी लक्षात आलं. नेतृत्त्वाची रचना तपासण्यापुरताच पक्षघटनेचा आधार असून खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच", असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.

Rahul Narwekar On MLA Disqualification Case : उद्धव ठाकरे गटाकडून याचिकेत केल्या गेलेल्या दाव्यांवर नार्वेकरांकडून सवाल उपस्थित

Rahul Narwekar On MLA Disqualification Case : उद्धव ठाकरे गटाकडून याचिकेत केल्या गेलेल्या दाव्यांवर नार्वेकरांकडून सवाल उपस्थित केले गेले आहेत. तर त्याला उत्तर देताना शिंदे गटाकडून सादर केलेली उत्तरं आणि पुराव्यांशी सहमत असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, शिवसेना नेतृत्त्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगानं दिलेला निकाल स्पष्ट आहे, पक्षात बंडखोरी झाल्यानंतर खरा पक्ष कोणाचा हा मुद्दाही विचारात घेणं महत्त्वाचं होतं, असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे. 

MLA Disqualification Case LIVE: निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेली शिवसेनेची घटना वैध : विधानसभा अध्यक्ष

MLA Disqualification Case LIVE: दोन्ही गटांकडून पक्षाची घटना मागितली गेली, पण दोन्ही गटांकडून घटना प्राप्त झाली नाही. अखेर निवडणूक आयोगानं दिलेली शिवसेनेच्या घटनेची प्रत ग्राह्य धरली जाईल. शिवसेनेच्या घटनेत 2018 साली करण्यात आलेली दुरुस्ती ग्राह्य धरता येणार नाही, असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं. 

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification LIVE VIDEO: आमदार अपात्रता प्रकरण निकालाचे अपडेट्स मिळवण्यासाठी पाहा VIDEO

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification LIVE VIDEO: विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचं वाचन सुरू, सर्व अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


Aamdar Apatrata Nikal LIVE Updates LIVE: 1999 सालची घटनाच वैध, 2018 सालची घटना अमान्य : विधानसभा अध्यक्ष

Aamdar Apatrata Nikal LIVE Updates LIVE: ''2018 सालची घटना ग्राह्य धरण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. पण, 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाईल. 2018 सालची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आली आहे.'', असं विधानसभा अध्यक्षांनी निकालवाचनात स्पष्ट केलं आहे.

Shiv Sena MLA Disqualification Case : 1999 सालची घटनाचं वैध, ठाकरेंनी दिलेली 2018 सालची घटना मान्य नाही : राहुल नार्वेकर

Shiv Sena MLA Disqualification Case : "1999 ची घटना शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे दाखल झालेली अभिलेखावर असलेली एकमेव घटना, प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या 1999 सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल, 2018 ची शिवसेनेची घटना स्विकारता करता येणार नाही", असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. 

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: 2018 ची घटना ग्राह्य धरणार नाही : विधानसभा अध्यक्ष

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification LIVE: "निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद आहे. खरी शिवसेना कुणाची हे सांगण्यासाठी घटनेचा आधार घेतला आहे आहे. निवडणूक आयोगाच निकाल, पक्षाची घटना याचा आधार निकाल देतान केला आहे.  2018 मध्ये घटनेच्या दुरूस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी केलेली घटनादुरूस्ती ही सर्वांच्या संमतीने झाली आहे. पण याबाबत निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड नसल्यामुळे ही घटना ग्राह्य धरणार नाही, तर जुनी घटना 1999 सालची ग्राह्य धरणार आहे.", असं अध्यक्षांनी निकाल वाचताना स्पष्ट केलं आहे. 

MLA Disqualification Case LIVE: 2018 मध्ये झालेल्या शिवसेना पक्षाच्या घटना दुरुस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती : विधानसभा अध्यक्ष

MLA Disqualification Case LIVE: सर्वात आधी खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय देणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. तसेच, त्यानंतर आमदार अपात्रतेवर निर्णय देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निकाल वाचनाला सुरुवात केली. 


"शिवसेनेची घटना काय आहे आणि त्यानुसार पक्ष कुणाचा याचा अभ्यास, निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद, 2018 सालची घटना ही यामध्ये महत्त्वाची मानली गेली आहे. घटनेच्या 10 व्या सुचीनुसार शिवसेना कुणाची? अधिकृत व्हीप कुणाचा? बुहमत कुणाचं हे ठरवणं होतं, 2018 मधील घटनेच्या दुरूस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी केलेली घटनादुरूस्ती ही त्यावेळी सर्वांच्या संमतीने. घटना, नेतृत्व, विधिमंडळ पक्षाचं बहुमत, हे पक्ष ठरवताना महत्वाचे घटक, 2018 ची घटना ग्राह्य धरणार नाही.", असं निकाल वाचताना विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. 

Aamdar Apatrata Nikal LIVE Updates: सर्वात आधी खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय, त्यानंतर आमदार अपात्रतेबाबत निर्णय : विधानसभा अध्यक्ष

Aamdar Apatrata Nikal LIVE Updates: विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकाल वाचनाला सुरुवात करण्यात आली आहे. सर्वात आधी खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय देणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. तसेच, त्यानंतर आमदार अपात्रतेवर निर्णय देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

MLA Disqualification Case : निकाल वाचनाला सुरुवात करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचे आभार

MLA Disqualification Case : निकाल वाचनाआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे हा निवाडा करण्याची संधी मिळाली, सर्व विधानसभा सहकाऱ्यांचे आभार, तसेच, सर्व वकिलांचेही आभार, असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी गटावार निकालाचं वाचन सुरू केलं आहे. 

Aamdar Apatrata Nikal LIVE: विधानसभा अध्यक्षांत ज्या 34 याचिका दाखल झाल्या, त्यावर निकाल : राहुल नार्वेकर

Aamdar Apatrata Nikal LIVE Updates: विधानसभा अध्यक्षांत ज्या 34 याचिका दाखल झाल्या होत्या त्यावर आज निकाल जाहीर होत आहे, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. तसेच, निकाल वाचनाला सुरुवात करताना विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. 


अध्यक्षांनी निकाल वाचनाला सुरुवात केली आहे. निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तसेच, महाराष्ट्राची धाकधूक वाढली आहे. 

MLA Disqualification Case LIVE Updates : विधानसभा अध्यक्ष सभागृहात दाखल

MLA Disqualification Case LIVE Updates : विधानसभा अध्यक्ष सभागृहात दाखल झाले असून काही क्षणांत आमदार अपात्रता प्रकरणी निकालाच्या वाचनाला सुरुवात होईल.


MLA Disqualification Case LIVE Updates : विधानसभा अध्यक्षांची वरिष्ठ वकिलांसोबतची बैठक संपली

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification Case Verdict LIVE Updates : वरिष्ठ वकिलांसोबतची बैठक संपली असून, विधानसभा अध्यक्ष थोड्याच वेळात बाहेर पडले असून आता निकालवाचनाला सुरुवात होईल.


पाहा लाईव्ह अपडेट



 


 

Rahul Narwekar, MLA Disqualification Case LIVE : निकाल देताना कुठलीही त्रुटी राहू नये म्हणून अध्यक्षांची वकिलांसोबत चर्चा

Rahul Narwekar, MLA Disqualification Case LIVE : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित आहेत. अध्यक्ष निकाल देताना कुठलीही त्रुटी राहू नये म्हणून अध्यक्ष वकिलांसोबत चर्चा करत असल्याची माहिती मिळत आहे. 

Amdar Apatra Nikal LIVE: विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंचे आमदार कुठे बसलेत?

MLA Disqualification Case LIVE: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधीमंडळाच्या सभागृहात पार पडणार आहे. आज विधानसभा अध्यक्ष निकाल वाचून दाखवणार आहेत. या सुनावणीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटातील नेते उपस्थित आहेत. निकाल वाचन विधीमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडणार आहे. सेंट्रल हॉलमध्ये सध्या यामिनी जाधव, बालाजी किणीकर, मंगेश कुडाळकर, भरत गोगावले मधल्या रांगेत बसले आहेत. 


सुनील प्रभू, अंबादास दानवे, वैभव नाईक, सुनील शिंदे हे उजव्या बाजूच्या रांगेत बसले आहेत. तर शिंदेगटाच्या मधल्या रांगेत शेवटच्या बाकावर दिपक केसरकर आणि राहुल शेवाळे एकत्र बसले आहेत. 

Amdar Apatra Nikal LIVE: आमदार अपात्रता निकालापूर्वी शिंदे गटाचे आमदार सभागृहात उपस्थित

Amdar Apatra Nikal LIVE: आमदार अपात्रता निकाल वाचनासाठी विधीमंडळाच्या सभागृहात शिंदे गटाचे आमदार उपस्थित आहेत. शिंदे गटाकडून बालाजी किणीकर, ज्ञानराज चौगुले,भरत गोगावले, संजय शीरसाट, यामिनी जाधव, दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे सभागृहात दाखल झाले आहेत. 

Aamdar Apatrata Nikal LIVE Updates: महाराष्ट्राच्या महानिकालाची कुणालाच धाकधूक नाही, कारण... : अंजली दमानिया

Aamdar Apatrata Nikal LIVE Updates: महाराष्ट्राच्या महानिकालापूर्वी राज्यासह देशाची धाकधूक वाढली आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, "महाराष्ट्राच्या महानिकालाची कुणालाच धाकधूक नाही, कारण महानिकाल काय येणार आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे." 



Rahul Narwekar, MLA Disqualification Case LIVE : निकाल वाचनाआधी विधानसभा अध्यक्षांची वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा, महाराष्ट्राची धाकधूक वाढली

Rahul Narwekar, MLA Disqualification Case LIVE : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधीमंडळाच्या सभागृहात पार पडणार आहे. आज विधानसभा अध्यक्ष निकाल वाचून दाखवणार आहेत. या सुनावणीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटातील नेते उपस्थित आहेत. निकाल वाचनाआधी विधानसभा अध्यक्षांची वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार. 

MLA Disqualification Case | निकाल Live : थोड्याच वेळात आमदार अपात्रतेचा निकाल

MLA Disqualification Case | निकाल Live : थोड्याच वेळात आमदार अपात्रतेचा निकाल. आमदार अपात्रता प्रकरणात निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागणार? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Shiv Sena MLA Disqualification Case LIVE : केसकरांचं वैभव नाईक, अंबादास दानवेंना हस्तांदोलन; मात्र बाजूलाच असलेल्या सुनील प्रभूंकडे दुर्लक्ष

Shiv Sena MLA Disqualification Case LIVE : महाराष्ट्र शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधीमंडळाच्या सभागृहात पार पडणार आहे. आज विधानसभा अध्यक्ष निकाल वाचून दाखवणार आहेत. या सुनावणीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटातील नेते उपस्थित आहेत. यावेळी शिंदे गटाचे आमदार  दिपक केसरकरही उपस्थित आहे. यावेळी केसरकरांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि अंबादास दानवे यांना हस्तांदोलन केलं. मात्र, यावेळी नाईक आणि दानवे यांच्यामध्ये बसलेल्या सुनील प्रभूंकडे त्यांनी पाहिलंही नाही.

MLA Disqualification Case LIVE LIVE Updates : आमदार अपात्रता निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात कडेकोट बंदोबस्त

MLA Disqualification Case LIVE : ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी आमदार अपात्रता निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तसेच या ठिकाणी जल्लोषाची तयारीला सुरुवात काही वेळात होईल.

MLA disqualification Case Live : सुनावणीसाठी सभागृहात येताच भरत गोगावलेंचा 'जय श्री राम'चा नारा

Shiv Sena MLA Disqualification Case LIVE : महाराष्ट्र शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधीमंडळाच्या सभागृहात पार पडणार आहे. आज विधानसभा अध्यक्ष निकाल वाचून दाखवणार आहेत. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले सभागृहात पोहोचले. आणि त्यांनी सभागृहात येताच 'जय श्री राम'चा नारा दिला. 

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: थोड्याच वेळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला! अपात्रता प्रकरणाच्या निकाल वाचनाला सुरुवात

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: थोड्याच वेळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला होणार, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे. 


सहा गटांत हा निकाल वाचला जाणार आहे.  सुमारे 200  पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे बाराशे पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे.  परिणामी, सहा गटांतील निकालांचा केवळ सारांश वाचला जाईल आणि नंतर संपूर्ण निकालाची प्रत दोन्ही गटांना पाठवली जाईल. 

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: महाराष्ट्राचा महानिकाल! विधानसभा अध्यक्षांकडून निकाल वाचनास सुरुवात

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! विधानसभा अध्यक्षांकडून निकाल वाचनास सुरुवात, कोण पात्र? कोण अपात्र? अवघ्या काही क्षणांत स्पष्ट होणार 

पाहा फक्त एका क्लिकवर...


Maharashtra MLA Disqualification: फक्त काही मिनिटं शिल्लक, धाकधूक वाढली; महाराष्ट्राचा महानिकाल आज

Shiv Sena MLA Disqualification Case : फक्त काही मिनिटं शिल्लक, धाकधूक वाढली; महाराष्ट्राचा महानिकाल आज


Maharashtra MLA Disqualification: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल सर्वात जलद फक्त 'एबीपी माझा'वर

Maharashtra MLA Disqualification: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल सर्वात जलद फक्त 'एबीपी माझा'वर 


 


Shrinivas Vanga on Maharashtra MLA Disqualification: निर्णय आमच्या बाजूनेच लागेल; शिंदेंच्या आमदारांना ठाम विश्वास

Maharashtra MLA Disqualification: पालघर विधानसभेचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा आपल्या कार्यालयात बसून सत्ता नाट्याचा निर्णय एबीपी माझावर पाहत आहेत आणि त्यांना ठाम विश्वास आहे की निर्णय आमच्या बाजूनेच लागेल कुणी कितीही मॅच फिक्सिंगचे वगैरे आरोप केले ते बिनबुडाचे आहेत त्यामुळे त्यांना आशा आहे की निर्णय आमच्या बाजूने लागेल आणि न्यायव्यवस्था आमच्या बाजूने योग्य निर्णय देईल असा त्यांना विश्वास आहे. 

Maharashtra MLA Disqualification: थोड्याच वेळात आमदार अपात्रतेचा निकाल, राज्यासह देशाचं लक्ष

Maharashtra MLA Disqualification: कोण पात्र? कोण अपात्र? कुठे पाहाल शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचं संपूर्ण अपडेट्स?


Tejas Thackeray on MLA Disqualification Case : निकाल काहीही येऊ द्या, आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल : तेजस ठाकरे

Tejas Thackeray on MLA Disqualification Case : निकाल काहीही येऊ द्या, आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल, असं म्हणत तेजस ठाकरेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 


 

Rahul Narwekar On MLA Disqualification Case : निकाल बेंचमार्क ठरेल, सर्वांना न्याय मिळेल : विधानसभा अध्यक्ष

Rahul Narwekar On MLA Disqualification Case : मुंबई : आज महाराष्ट्राच्या राजाकारणातील ऐतिहासिक दिवस असून संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींकडे लागलं आहे. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय जाहीर करणार आहेत. अशातच निकालापूर्वी माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली. निकालात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले. संविधानात ज्या लिखित तरतूदी आहेत, त्या सर्व तरतूदींना अनुसरुनच हा निर्णय असेल, असंही ते म्हणाले आहेत. तसेच, हा निर्णय देताना कायद्याचं पालन होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


सविस्तर वृत्त येथे वाचा 

Shiv Sena MLA Disqualification Case : शिंदे अपात्र ठरले तर मुख्यमंत्री पद जाणार?

Shiv Sena MLA Disqualification Case : एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. पण मुख्यमंत्री नवे असतील. अशा स्थितीत अजित पवार गटाकडून दावा केला जाऊ शकतो. अजित पवार यांच्याकडे राज्याची सुत्रे दिली जाऊ शकतात. राज्य सरकारकडे काही महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे अजित पवार यांना मुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर तशा चर्चाही होत्या.  


Maharashtra Shiv Sena MLA Disqualification: शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप; पण नेमकं घडलेलं काय?

Maharashtra Shiv Sena MLA Disqualification: 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला. 40 आमदारांना सोबत घेत त्यांनी सूरतमार्गे गुवाहाटी गाठली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं होतं. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री झाले. हे सर्व सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टानं 10 जानेवारीपर्यंत या प्रकरणाचा निर्णय देण्याचे आदेश राहुल नार्वेकर यांना दिले. आज ही मुदत संपुष्टात आली आहे. राहुल नार्वेकर थोड्याच वेळात आमदार अपात्रेवर निर्णय देणार आहेत. 

Maharashtra MLA Disqualification: एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास भाजपचा प्लॅन काय? कोण होणार मुख्यमंत्री?

Shiv Sena MLA Disqualification Case Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर थोड्याच वेळात शिवसेना आमदार अपात्रेचा (Maharashtra Disqualification Case) निकाल देणार आहेत. या निकालानंतर राज्याच्या राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळी दिशा मिळेल.  एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे कुणाच्या बाजूने निकाल लागणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र केले तर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अनेक चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरी राज्यातील सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही सांगितलं जातेय. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर भाजपचा प्लॅनही तयार असल्याचं बोललं जातेय. 


वाचा सविस्तर 

Maharashtra MLA Disqualification: थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्ष निकाल जाहीर करणार, संपूर्ण राज्याचं लक्ष

Maharashtra MLA Disqualification: राज्याच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय अवघ्या दीड तासांवर येऊन ठेपलाय.  दुपारी साडेचार वाजल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात येईल. जवळपास एक ते दीड तास निकालाचे वाचन होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचतील. या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाणार आहे. साऱ्या देशाचं लक्ष आजच्या निकालाकडे लागून राहिलंय.  मुख्यमंंत्री एकनाथ शिंदेच अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा धक्का असेल. कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ 16 आमदार शिल्लक आहेत, त्यातील 14 अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो. 

MLA Disqualification Case : आजचा निकाल ठाकरेंच्या विरोधात जाणार : सूत्र

MLA Disqualification Case : आजचा निकाल ठाकरेंच्या विरोधात जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल जाहीर करणार आहेत. त्यापूर्वी समोर आलेल्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 

MLA Disqualification Case : आमदार अपात्रता निकालाचे सर्व अपडेट्स येथे पाहा...

MLA Disqualification Case : आमदार अपात्रता निकालाचे सर्व अपडेट्स येथे पाहा...


Shiv Sena MLA Disqualification Case : आमदार अपात्रता निकालापूर्वी सुषमा अंधारे दगडूशेठ चरणी लीन

Shiv Sena MLA Disqualification Case : आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष तथा लवाद आज निकाल देणार आहेत. आमदारांवर टांगती तलवार आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या संकल्पनेनुसार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला  सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत साकडे घालण्याचे ठरविले आहे.

भरत गोगावले नियमबाह्य, शिंदे गटाचे आमदार 100 % अपात्र होतील, भास्कर जाधवांचा दावा

Bhaskar Jadhav on Shiv Sena MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणावर काही तासांत निर्णय येणार आहे. त्याआधी अनेक आमदार-खासदार आणि नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र होतील, असा दावा केला आहे. विधानसभा अध्यक्षांनी नियमांनुसार, पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार,घटनेनूसार जर  निर्णय दिला तर शिंदे गटाचे आमदार 100 टक्के अपात्र होतील, असे भास्कर जाधव म्हणालेत. 


वाचा सविस्तर 

Shiv Sena MLA Disqualification Case : सुरतला सर्वात अगोदर रवाना झालेले  चिमणराव पाटील  पात्र की अपात्र?

Shiv Sena MLA Disqualification Case : मंत्रीपदासाठी ठाकरेंची साथ सोडली, बंडाळीनंतरही नशीबी उपेक्षाच! सुरतला सर्वात अगोदर रवाना झालेले  चिमणराव पाटील  पात्र की अपात्र?


MLA Disqualification Case : गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या (Maharashtra News) जनतेनं न भूतो न भविष्यती असे एक ना अनेक बदल अनुभवले आहेत. राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी घडल्या. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. आज म्हणजेच, 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना आमदार (Shiv Sena MLA Disqualification Case) अपात्रता सुनावणीचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, हा संपूर्ण निकाल सर्वांना लाईव्ह पाहाता येणार आहे. विधीमंडळाकडून याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. 


वाचा सविस्तर 

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेचा निकाल लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE Updates : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालात हे असू शकतात ठळक मुद्दे...

Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE Updates : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालात हे असू शकतात ठळक मुद्दे...

- एकूण 34 याचिकांचे 6 गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली. त्यानुसार, सहा गटांत निकाल वाचला जाईल
- सुमारे 200 पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे 1200 पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे.
- परिणामी, सहा गटांतील निकालाचा सारांश केवळ वाचला जाईल. याउलट संपूर्ण निकालाची प्रत ही दोन्ही गटांना पाठवली जाईल.

निकालाचे परिणाम काय असतील? जाणून घेऊया ग्राफिक्सच्या मदतीने...
- पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
- सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होतील.
- अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार हे स्पष्ट होतील.
- राजकीय पक्ष व विधीमंडळ पक्ष यांच्या कार्यकक्षा स्पष्ट होतील.

Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE Updates : ठाकरे गटाविरोधात निकाल लागणार : वैभव नाईक

Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE Updates : ठाकरे गटाविरोधात निकाल लागणार, शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दोन दिवसांपूर्वीच ठरला, असा दावा ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केला आहे.

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालासाठी उरले फक्त दीड तास, शिवसेनेच्या भवितव्याचा फैसला

MLA Disqualification Case : राज्याच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेला. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय अवघ्या 2 तासांवर येऊन ठेपलाय.  दुपारी साडेचार वाजल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात येईल. जवळपास एक ते दीड तास निकालाचे वाचन होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचतील. या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाणार आहे. साऱ्या देशाचं लक्ष आजच्या निकालाकडे लागून राहिलंय.  मुख्यमंंत्री एकनाथ शिंदेच अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा धक्का असेल. कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ 16 आमदार शिल्लक आहेत, त्यातील 14 अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो. 

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल 2 दिवसांपूर्वीच ठरला; वैभव नाईकांचा दावा

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल 2 दिवसांपूर्वीच ठरला असून आमच्याविरोधात निकाल लागणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. वैभव नाईकांच्या दाव्यानं खळबळ माजली आहे. 


निकाल आमच्याविरोधात लागणार हे आत्ताच कळलंय,त्यामुळेआता निकालाबाबत उत्सुक नाही, असं वैभव नाईक म्हणाले आहेत. 


मला आत्ताच मंत्रालयात शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे असे दोन आमदार भेटले, त्यांनी खात्रीपूर्वक सांगितलंय की, निकाल आमच्याविरोधात जाणार आहे, निकाल आमच्या विरोधात गेला तर पुन्हा न्यायालयात जाऊ, असंही वैभव नाईक यांनी सांगितलं आहे. 

CM Eknath Shinde PC: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निकालानंतर वर्षावर पत्रकार परिषद , भूमिका करणार स्पष्ट

CM Eknath Shinde PC:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निकालानंतर वर्षावर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे सध्या हिंगोलीच्या दौ-यावर आहेत . हिंगोलीवरून आल्यावर मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधणार आहे. या निकालाचे परिणाम आगामी निवडणुका आणि राजकीय कारकीर्दीवर होण्याची शक्यता  आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे

पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळणार? सूत्रांची माहिती

आमदार अपात्रता प्रकरण निकालासंदर्भात या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आज कुणाच्याच विरोधात निर्णय लागणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गट (Eknath Shinde) आणि ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवण्यात येणार नसल्याची माहिती एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात जाऊन फैसला करावाअशा निर्णयाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Shiv Sena MLA Disqualification Case LIVE Updates : कुणीही अपात्र होणार असा निर्णय अध्यक्ष देण्याची शक्यता

Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE Updates : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी आज निर्णय कुणाच्याही विरोधात न येण्याची शक्यता आहे. कुणीही अपात्र होणार असा निर्णय अध्यक्ष देण्याची शक्यता आहे. एबीपी माझाला सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.




 

Krupal Tumane Reaction on MLA Disqualification : आजचा निकाल आमच्याच बाजूने लागेल : कृपाल तुमाने
Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE Updates : आजचा दिवस शिंदे गटातील सर्वांसाठी एक सामान्य दिवस आहे.. आम्ही सर्व आपापली कामे करत आहोत. शिवसेनेमध्ये अन्यायाच्या विरोधात आम्ही जो उठाव केला होता, तो पूर्णपणे कायदेशीर बाजू तपासून केला होता. आमच्यावर व्हीपच्या उल्लंघनाचा जो आरोप केला जात आहे, तर आम्ही व्हीपचा कुठलाही उल्लंघन केलेला नाही. कारण व्हीप विधानसभेच्या कामकाजासाठी असतो, कोणाच्या घरच्या मीटिंगसाठी लागू होत नाही. दहाव्या परिशिष्ट प्रमाणे ही आम्ही कायद्याचा कुठलाही उल्लंघन केलेलं नाही. अन्यायाचा विरोधात लढणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि आम्ही ते केलेले आहे.. आम्ही पूर्णपणे कायदेशीर आणि घटनात्मक काम केले आहे, म्हणून आजचा निकाल आमच्याच बाजूने लागेल असा शंभर टक्के विश्वास असल्याचं शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे.
MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालासाठी दोन्ही गटाच्या वकिलांना उपस्थित राहण्यासाठी मेल

MLA Disqualification Case : निकालासाठी दोन्ही गटाच्या वकिलांनी उपस्थित रहावे यासाठी विधिमंडळाकडून वकिलांना मेल


जवळपास एक ते दीड तास निकालाचे वाचन होईल

Shiv Sena MLA Disqualification Case LIVE Updates : आमदार अपत्रतेचा निकाल एकनाथ शिंदे यांचा बाजूने येणार शिवसैनिकांची भावना 

Hingoli Shivsainik Reaction : आमदार अपात्रता प्रकरणी आज 4 वाजताच्या सुमारास निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मी लागेल, अशी भावना  हिंगोलीतील शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.

Shiv Sena MLA Disqualification Case LIVE Updates : आमदार अपात्रता सुनावणीचं थेट प्रक्षेपण होणार

 Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE Updates : आमदार अपात्रता सुनावणीचं थेट प्रक्षेपण होणार, संपूर्ण निकालवाचन लाईव्ह पाहता येणार



MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाच्या वेळी ठाकरे गटाकडून वकील उपस्थित, तर नेते अनुपस्थितीत?

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या कायदेशीर लढाईत महत्वाची भूमिका बजावणारे ठाकरेंचे दोन शिलेदार निकालाच्या दिवशी मात्र अनुपस्थितीत


अनिल देसाई कोल्हापुरात तर अनिल परब मुंबईबाहेर


अनिल परब आणि अनिल देसाई निकाल वाचनाच्या वेळी विधानभवनात उपस्थित राहणार नाहीत


सुप्रीम कोर्टातील कायदेशीर लढाई,निवडणूक आयोगातील लढाई तसंच विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीत या दोघांचा महत्वाचा सहभाग 


केवळ ठाकरे गटाचे वकील विधानभवनात उपस्थित राहणार


आमदार अपात्रतेच्या निकालाच्या वेळी ठाकरे गटाकडून वकील उपस्थित राहणार तर नेते अनुपस्थितीत?

Bhaskar Jadhav : हाडाचे शिवसैनिक आणि आक्रमक राजकारणी भास्कर जाधव पात्र की अपात्र?

राज्याच्या राजकारणात गेल्या वर्षभरात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंपानं सर्वांनाच धक्का बसला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिवसेनेचे दोन गट झाले. शिवसेनेचं बंड आणि राजकारणातील नाट्यम घडामोडी यामध्ये अनेक नावे चर्चेत आली. त्यामधीलच एक नाव म्हणजे भास्कर जाधव. शिवसेना ठाकरे गटाचे गुहागरचे आमदार (Guhagar MLA) भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) नेहमीच त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे चर्चेत असतात. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Shiv Sena MLA Disqualification Case LIVE Updates : राहूल नार्वेकर यांची 'नार्को टेस्ट' करा : आमदार नितीन देशमुख

Akola Nitin Deshmukh Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची 'नार्को टेस्ट' करण्याची खळबळजनक मागणी अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलीये. ते अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत होतेय. आजच्या सत्तासंघर्ष निकालाचा कोणताही ताण आमदार नितीन देशमुख यांच्यावर दिसत नाहीये. 

Shiv Sena MLA Disqualification Case LIVE Updates : ...तर शिंदे गटाचे आमदार 100 टक्के अपात्र : भास्कर जाधव
चिपळूण : नियमानुसार, पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार, घटनेनूसार जर अध्यक्षांनी निर्णय दिला तर शिंदे गटाचे आमदार 100% अपात्र होतील. आमदार अपात्र होणं शिवसेनेवर परिणाम करणार, अशा प्रकारचं प्रकरण नाही. यात काही चुकीचा निर्णय झाला तर देशाच्या लोकशाहीवर परिणाम करणारा निर्णय असू शकेल, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे.
Shiv Sena MLA Disqualification Case LIVE Updates: आम्ही शिवसेनेसाठी डोक्याला कफन बांधून उतरलेलो आहोत : अजय चौधरी

Ajay Choudhary on Shiv Sena MLA Disqualification Case : आम्ही आमच्या शिवसेनेसाठी डोक्याला कफन बांधून उतरलेले लोक आहोत, पक्षासाठी आम्ही आमचे आमदारकी कधीही बहाल करायला तयार आहोत, असं वक्तव्य अजय चौधरी यांनी केलं आहे.

Shiv Sena MLA Disqualification Case LIVE Updates : सगळ्यांना न्याय मिळेल : राहुल नार्वेकर

Rahul Narwekar On MLA Disqualification : कायद्याला धरुन निर्णय दिला जाईल, सगळ्यांना न्याय मिळेल : राहुल नार्वेकर


 


Shiv Sena MLA Disqualification Case Updates : राजकीय भवितव्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा

Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE Updates : राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकीय भवितव्यासाठी गुरुवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. 10 जानेवारी 2024, म्हणजेच गुरुवारी शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) सुनावणीचा निर्णय जाहीर होत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं असून केवळ आमदारांचीच नाही, तर संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली आहे.

MLA Disqualification Case LIVE Updates : आमदार अपात्रता प्रकरणाशी आता माझा संबंध नाही : नरहरी झिरवाळ

मुंबई : मी उपाध्यक्ष असताना जो निर्णय घेतला होता तो त्यावेळीची परिस्थिती आणि माझ्यासमोर ठेवलेल्या बाबी या पाहून घेतला होता. आता माझा त्या विषयाशी संबंध नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ यांनी दिलीय. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय भवितव्यासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) सुनावणीचा निर्णय जाहीर होत आहे.  तसेच  आजच्या निकालाचा आमच्या निकालावर परिणाम होईल असं वाटत नाही, असेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal ) एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

MLA Disqualification Case LIVE: कोण पात्र? कोण अपात्र? आज महानिकाल

Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE Updates: मुंबई : दीड वर्षांपूर्वी म्हणजे 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि आपल्या समर्थक आमदारांना घेऊन ते सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले. त्यानंतर त्यांना मिळणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होत गेली. नंतर शिंदेंनी भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री झाले. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल देत पक्षावर त्यांचा दावा योग्य ठरवला


आमदारांनी बंड केलं, पण त्याचवेळी हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. पक्षांतर बंदीच्या कायद्याखाली 16 बंडखोर आमदारांना अपात्र करा अशा आशयाची याचिका उद्धव ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली. त्याचवेळी आपलीच सेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे गटानेही उद्धव ठाकरेंच्या 14 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखले केली. 


सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाचा प्रतोद योग्य ठरवला, पण आमदारांच्या अपात्रतेसंबंधित निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना असल्याचं सांगितलं. त्यानंतर वेळोवेळी निर्देश देऊन शेवटी 10 जानेवारीपर्यंत आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष आज सेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेणार आहेत. 

Shiv Sena Case LIVE : शिवसेनेचे कोण-कोण आमदार आज पात्र-अपात्र ठरणार?

Shiv Sena Case LIVE : राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या संत्तासंघर्षाच्या घटनेमध्ये (Shiv Sena MLA Disqualification Case ) आता सर्वात मोठा टप्पा आला आहे. या सत्तासंघर्षामध्ये शिवसेना शिंदे गटाचे 16 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा फैसला अवघ्या काहीच वेळेमध्ये होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  (Rahul Narwekar)  हे या संदर्भातील आपला निकाल सुनावणार असून त्यामुळे दोन्ही गटाच्या आमदारांचे भवितव्य काय असेल हे स्पष्ट होणार आहे. 


शिवसेनेच्या ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यामध्ये शिंदे गटाच्या 16 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांचा समावेश आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यात आलेली नाही. तसेच अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके यांच्या विरोधात सुद्धा याचिका दाखल करण्यात आली नाही. 

Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालात हे असू शकतात ठळक मुद्दे...

Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालात हे असू शकतात ठळक मुद्दे...



  • एकूण 34 याचिकांचे 6 गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली. त्यानुसार, सहा गटांत निकाल वाचला जाईल

  • सुमारे 200 पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे 1200 पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे. 

  • परिणामी, सहा गटांतील निकालाचा सारांश केवळ वाचला जाईल. याउलट संपूर्ण निकालाची प्रत ही दोन्ही गटांना पाठवली जाईल.

  • पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होतील. 

  • अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार हे स्पष्ट होतील.

  • राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष यांच्या कार्यकक्षा स्पष्ट होतील.

Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE Updates: अपात्रतेची टांगती तलवार असणारे दोन्ही गटातील आमदार

Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE Updates: अपात्रतेची टांगती तलवार असणारे दोन्ही गटातील आमदार


शिवसेना शिंदे गट 16 आमदार 


1) एकनाथ शिंदे 
2) चिमणराव पाटील
3) अब्दुल सत्तार
4) तानाजी सावंत
5) यामिनी जाधव 
6) संदीपान  भुमरे
7) भरत गोगावले
8) संजय शिरसाठ 
9) लता सोनवणे
10) प्रकाश सुर्वे
11) बालाजी किणीकर
12) बालाजी कल्याणकर
13) अनिल बाबर
14) संजय रायमूळकर
15) रमेश बोरनारे
16) महेश शिंदे


शिवसेना ठाकरे गटाचे आमदार


1) अजय चौधरी
2) रवींद्र वायकर
3) राजन साळवी
4) वैभव नाईक
5) नितीन देशमुख
6) सुनिल राऊत
7) सुनिल प्रभू
8) भास्कर जाधव
9) रमेश कोरगावंकर
10) प्रकाश फातर्फेकर 
11) कैलास पाटिल
12) संजय पोतनीस
13) उदयसिंह राजपूत
14) राहुल पाटील

MLA Disqualification Case Verdict LIVE Updates: वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची तातडीची बैठक, विविध मुद्द्यांवर चर्चा

MLA Disqualification Case Verdict LIVE Updates: शिवसेना आमदार अपात्रता निकालाच्या पूर्वसंध्येला शिंदे गटाची तातडीची बैठक पार पडली. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयापूर्वी वर्षावर झालेल्या या बैठकीत, आमदार अपात्रतेच्या निर्णयानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, मराठा आरक्षण आणि पंतप्रधान मोदींचा दौऱ्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. 

MLA Disqualification Case Verdict LIVE: सरकार टिकलं तर मंत्रालयही गुजरातला हलवतील : आदित्य ठाकरे

MLA Disqualification Case Verdict LIVE: 'शिंदे आणि नार्वेकर यांची भेट योग्य नव्हे', 'ती भेट म्हणजे न्यायमूर्ती आणि आरोपीनं भेटण्यासारखं', तर येणारा निर्णय घटनेनुसार असेल अशी आशा, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, तर सरकार टिकलं तर मंत्रालयही गुजरातला हलवतील, असा टोला आदित्य ठाकरेंनी भाजपला  लगावला आहे.

MLA Disqualification Case: ठाकरे गटाकडून नार्वेकर-शिंदेंच्या भेटीवर आक्षेप

MLA Disqualification Case: ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या भेटीवर आक्षेप, सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील प्रतिज्ञापत्र दाखल, यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया आणि एबीपी माझाच्या बातमीचा ठाकरे गटाकडून संदर्भ.

Shrinivas Vanga on MLA Disqualification Case: आमच्यावर कोणताही दबाव नाही : श्रीनिवास वनगा

Shrinivas Vanga on MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदे  गटाच्या बाजूूने निर्णय लागेल, शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा दावा, तर महायुतीतील कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा आमच्यावर दबाव नाही , वनगा यांचं वक्तव्य. 

Anil Desai on Shiv Sena MLA Disqualification Case: शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील : अनिल देसाई

Anil Desai on Shiv Sena MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेच्या निर्णयात शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील, ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंचा दावा, लोकशाहीला धरून निकाल येईल अशी अपेक्षा, देसाईंची प्रतिक्रिया.

Rahul Narwekar: प्रक्रिया पुर्ण करून निकाल देण्याचा प्रयत्न करू : राहुल नार्वेकर

Rahul Narwekar on MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर  निकालासंदर्भात जी काही प्रक्रिया पुर्ण करून आम्ही निकाल देण्याचा प्रयत्न करू निकाल देताना जवळपास 34 याचिका होत्या त्यामुळे निकाल देताना वेळ लागणारच राष्ट्रवादी पक्षाचा देखील 30  जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. 

MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल, दुपारी चारनंतर निर्णय

MLA Disqualification Case: महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी देण्याची क्षमता असलेला. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय आज दुपारी चार वाजल्यानंतर येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचतील. या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाणार आहे. साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीचा निर्णय येणार असल्यानं सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंंत्री एकनाथ शिंदेच अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा दणका असेल. कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ 16 आमदार शिल्लक आहेत, त्यातील 14 अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो. 

पार्श्वभूमी

Shiv Sena MLA Disqualification Case Verdict LIVE Updates: मुंबई : राज्याच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेला... शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय अवघ्या दीड तासांवर येऊन ठेपलाय.  दुपारी साडेचार वाजल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात येईल. जवळपास एक ते दीड तास निकालाचे वाचन होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचतील. या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाणार आहे. साऱ्या देशाचं लक्ष आजच्या निकालाकडे लागून राहिलंय.  मुख्यमंंत्री एकनाथ शिंदेच अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा धक्का असेल. कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ 16 आमदार शिल्लक आहेत, त्यातील 14 अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो. 


शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालात हे असू शकतात ठळक मुद्दे...



  • एकूण 34 याचिकांचे 6 गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली. त्यानुसार, सहा गटांत निकाल वाचला जाईल

  • सुमारे 200 पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे 1200 पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे. 

  • परिणामी, सहा गटांतील निकालाचा सारांश केवळ वाचला जाईल. याउलट संपूर्ण निकालाची प्रत ही दोन्ही गटांना पाठवली जाईल. 
    पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होतील. 

  • अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार हे स्पष्ट होतील.

  • राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष यांच्या कार्यकक्षा स्पष्ट होतील.


Shiv Sena Maharahtra MLA Disqualification Case Verdict LIVE Updates : अपात्रतेची टांगती तलवार असणारे दोन्ही गटातील आमदार


शिवसेना शिंदे गट 16 आमदार 


1) एकनाथ शिंदे 
2) चिमणराव पाटील
3) अब्दुल सत्तार
4) तानाजी सावंत
5) यामिनी जाधव 
6) संदीपान  भुमरे
7) भरत गोगावले
8) संजय शिरसाठ 
9) लता सोनवणे
10) प्रकाश सुर्वे
11) बालाजी किणीकर
12) बालाजी कल्याणकर
13) अनिल बाबर
14) संजय रायमूळकर
15) रमेश बोरनारे
16) महेश शिंदे


शिवसेना ठाकरे गटाचे आमदार


1) अजय चौधरी
2) रवींद्र वायकर
3) राजन साळवी
4) वैभव नाईक
5) नितीन देशमुख
6) सुनिल राऊत
7) सुनिल प्रभू
8) भास्कर जाधव
9) रमेश कोरगावंकर
10) प्रकाश फातर्फेकर 
11) कैलास पाटील
12) संजय पोतनीस
13) उदयसिंह राजपूत
14) राहुल पाटील

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.