एक्स्प्लोर

भरत गोगावले नियमबाह्य, शिंदे गटाचे आमदार 100 % अपात्र होतील, भास्कर जाधवांचा दावा

Shiv Sena MLA disqualification case : आमदार अपात्रता प्रकरणावर काही तासांत निर्णय येणार आहे. त्याआधी अनेक आमदार-खासदार आणि नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत.

bhaskar jadhav on Shiv Sena MLA Disqualification Caseआमदार अपात्रता प्रकरणावर काही तासांत निर्णय येणार आहे. त्याआधी अनेक आमदार-खासदार आणि नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र होतील, असा दावा केला आहे. विधानसभा अध्यक्षांनी नियमांनुसार, पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार,घटनेनूसार जर  निर्णय दिला तर शिंदे गटाचे आमदार १०० % अपात्र होतील, असे भास्कर जाधव म्हणालेत. 

भरत गोगावले नियमबाह्य

काही चुकीचा निर्णय झाला तर देशाच्या लोकशाहीवर परिणाम करणारा निर्णय असू शकेल. भरत गोगावले नियमबाह्य आहेत. सर्वीच घटनात्मक पद आता मोडीत निघालेली आहेत. नियम कायदा पाळणारे हे लोक आहेत का? असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केलाय. देशाची लोकशाही आणि संविधानाचा सन्मान राखायचा असेल सर्वोच न्यायालयाचा राखायचा असेल तर आम्ही अपात्र होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अपात्र होइल तो शिंदे गटच अपात्र होइल.हेच नियमाला धरुन असेल, असेही भास्कर जाधव म्हणाले. 

आमचे आमदार अपात्र ठरण्याचा तीळमात्र कुठूनही, कायद्याने, नियमाने जरा सुद्धा संबंध नाही. पण तरीदेखील सर्व नियम आणि कायदे जर धाब्यावरच बसवायच ठरवलेय दिसतंय. एकनाथ शिंदेंना कल्पना देऊन अध्यक्ष त्यांच्या भेटीला गेले. आजपर्यत या पदावर असताना कोणीही कुठल्याही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, असे अजिबात ऐकण्यात नाही. खर तर मुख्यमंत्री अध्यक्षांना भेटायला येतात परंतू इथं अध्यक्ष स्वता भेटायला जातात, असा टोलाही भास्कर जाधवांनी लगावला. 

सरकारवर हल्लाबोल

मी का गेलो याच सरळ सरळ समर्थन करतात. याचाच अर्थ ही जी घटनात्मक पद आहेत. याची गलीमा संपलेली आहे.ही पदे आता शोभेची पदे राहिलेत काय? असा संशय वाटतो. जिथे जिथे विरोधी पक्षाची सरकार आहेत,विरोधी पक्षाची नेते आहेत त्यांना ed,cbi,ni या केंद्रीय चौकशी यंत्रणा आहेत, यांचा वापर करुन पार नामोहरण करण्याचा सध्या काम सुरु आहे, असे भास्कर जाधव म्हणाले. 

अशाप्राकारची भीती घालून,घाबरवून,चौकशा लावणं अन् त्यानंतर स्वत:च्या पक्षात घेणं आणि मग चौकश्या थांबवणं. छगन भुजबळांच काय झालं. रविंद्र वायकरांना हा छळवाद बरेच दिवसांपासून सुरु आहे. हा छळ वाद केवळ राजकारणापुरता होतोय. हे अत्यंत लोकशाहीला मारक आहे, असे भास्कर जाधव म्हणाले. 

आणखी वाचा :

Shiv Sena MLA Disqualification Case : प्रतीक्षा संपणार! शिवसेना आमदार अपात्रतेचा आज महानिकाल, विधानसभा अध्यक्षांकडे देशाचे लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget