एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : आमची घटना अवैध तर मग आमदार पात्र कसे? स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Verdict: शिवसेना ही संपणार नाही, शिवसेना ही गद्दार किंवा मिंध्यांची हे देखील जनता मान्य करणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Shiv Sena MLAs Disqualification : शिंदेंची शिवसेना ही त्यांची कधीच होऊ शकत नाही, त्यांचा आणि शिवसेनेचा संबंध कधीच संपला आहे, त्यामुळे शिवसेना ही आमचीच आहे असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्ष कसा बदलावा हे सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले असं सांगत त्यांनी नार्वेकरांवरही आरोप केले. आमची घटना जर अवैध असेल तर मग आमचे आमदार अपात्र कसे काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. 

गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वकरांनी निकाल दिला. शिवसेना ही शिंदेची असल्याचं सांगत त्यांनी दोन्ही गटाच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळल्या. त्यावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "स्वतः दोन तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी त्यांनी पक्षांतर कसं करावं याचा निर्णय दिला. विधानसभा अध्यक्षांना जे काही संरक्षण असतात त्याचा त्यांनी गैरवापर केला. शिवसेना कुणाची हे लहान मुलही सांगू शकतं."

सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले

आजच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, नार्वेकरांना त्या ठिकाणी कशासाठी बसवण्यात आलं ते आता समोर आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वोच्च असतात, एक परिमान असते. पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले. त्यांच्या मागे महाशक्ती असल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या वर असल्याचं दाखवून दिलं. शिवसेना कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. पण नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याच्या सरकारने लोकशाही पायदळी तुडवली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अधिकार तरी बाधित राहतात का हे पाहावं. त्यासाठी सुमोटो याचिका दाखल करून घ्यावी.

उबाठा नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचा गट म्हणजे उबाठा नाही. उबाठा, उबाठा काय? उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट नाव आहे, आणि उबाठा असेल तर होय, मी उभा ठाकलेला आहे.

शिवसेना शिंदेंचीच, भरत गोगावले हेच व्हिप

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन आज पार पडलं. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवला. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला. 

उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केली. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. 

दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. आजच्या निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच कालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केला. दरम्यान निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget