(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Sena : सत्तासंघर्षाच्या लढाईत शिंदेच वरचढ! आधी निवडणूक आयोग, नंतर न्यायालय आणि आता विधानसभा; थेट लढतीत एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर तिसऱ्यांदा मात
Shiv Sena MLAs Disqualification Verdict : शिवसेनेतील बंडानंतर आतापर्यंत प्रत्येक कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मात केल्याचं दिसून आलंय.
Shiv Sena MLAs Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर झाला असून विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. बहमताच्या आधारे शिदेंचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) दिला. तसेच ठाकरे गटाचे आमदार पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्र ठरवण्यात आले आहेत. शिवसेनेतील बंडानंतर आतापर्यंतच्या प्रत्येक लढाईत एकनाथ शिंदे हेच वरचढ ठरले असून त्यांनी तिसऱ्यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मात केल्याचं दिसून आलं.
आधी निवडणूक आयोग, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि आता विधानसभा सभागृहात अशा तीन वेळच्या थेट लढतीत एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरले आहेत.
निवडणूक आयोगाचा निर्णय शिंदेच्या बाजूने
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. त्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला. त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेच्या बाजूने निकाल देत पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह त्यांना दिलं. सत्तासंघर्षाच्या लढाईत शिंदे यांची ही पहिली बाजी होती.
सर्वोच्च न्यायालयातही वरचढ
शिवसेनेचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी झालेल्या युक्तिवादात एकनाथ शिंदे यांच्या गटानेच बाजी मारल्याचं दिसून आलं. त्यावेळी शिंदे गटाचं सर्व काही चुकलं असलं तरी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे आपण परत मागे जाऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आणि आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेण्याचे आदेश दिले.
विधानसभा अध्यक्षांचा निर्णय शिंदे यांच्याच बाजूने
आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांसमोर आल्यानंतर या ठिकाणीही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर मात केल्याचं दिसलं. दोन्ही गटाचे आमदार अपात्र ठरले नसले तरीही शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा राहुल नार्वेकरांनी दिला.
राहुल नार्वेकर म्हणाले की, 21 जून 2022 रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते असं महत्वपूर्ण निरीक्षण राहुल नार्वेकरांनी नोंदवलं. तर पक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत असा निर्णय नार्वेकरांनी दिला.
या तीनही घटनांवरून असं लक्षात येतं की एकनाथ शिंदे यांनी बहुमताच्या आधारे तीनही कायदेशीर लढाईमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर मात केली आहे.
ही बातमी वाचा :