एक्स्प्लोर

Eknath Shinde : आजच्या निकालामुळे घराणेशाही मोडीत निघाली, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदेंची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवत खरी शिवसेना शिंदेंचीच असल्याचं म्हटलं. या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. आजच्या निर्णयामुळे घराणेशाही मोडीत निघाल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. पक्ष कोणाचीही खासगी मालमत्ता नसते असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. 

आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकालवाचन केलं. यावेळी त्यांनी दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निर्णय दिला. पण खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं म्हटलं. निवडणूक आयोगाचा निकालाला दुजोरा देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. तसेच सुप्रीम कोर्टाने भरत गोगावले यांचा अवैध ठरवलेला व्हीप हा विधानसभा अध्यक्षांनी वैध 
ठरवला. 

नेमका निकाल काय? 

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन आज पार पडलं. आणि एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवलाय. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केलीय. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय.

सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिलीय. आणि निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच, निकालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केलाय. दरम्यान, निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच, या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.

हेही वाचा : 

Sanjay Raut : 'औकात क्या है तुम्हारी' आजचा निकाल हा कोणताही निर्णय नाही, हे षडयंत्र, संजय राऊतांचा घणाघाती वार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyach Bola | छत्रपती संभाजीनगरचा गड कोण राखणार? शिवसेनेची हवा कशी? ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 09 November 2024Sharad Pawar speech Parli : Dhananjay Munde यांच्या मतदारसंघात शरद पवार यांचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 09 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Pakistan Railway Station Blast : स्फोट, धूर, आक्रोश करणारे लोक, पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, व्हिडीओ समोर 
पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, 24 जणांचा मृत्यू, व्हिडीओ समोर 
Mallikarjun Kharge on PM Modi : महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Embed widget