एक्स्प्लोर
दानवेंना सत्तेचा माज, माझ्यामुळे ते जमिनीवर : अर्जुन खोतकर
भाजपाध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी दरम्यान रावसाहेब दानवे यांना डावलण्यात खुद भाजप नेत्यांचाच हात असून दानवे शिवसेना संपवायला निघाले असल्याचा आरोप शिवसेना नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला.
जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सत्तेची मस्ती, सत्तेचा माज आणि सत्तेची गुर्मी आहे. माझ्या धाकामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर आहे, असा घणाघात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंवर केला आहे. त्यांनी एबीपी माझाशी खास बातचित केली.
“जालना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर दानवेंचा प्रचंड दबाव असून, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार प्रचंड दहशतीखाली आहेत. दानवे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना 4-4 तास बाहेर उभं करतात, त्यांना घर गड्यासारखं वागवतात. दानवे आणि त्यांच्या कुटुंबाकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे.” असा आरोप खोतकरांनी दानवेंवर केला.
भाजपाध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी दरम्यान रावसाहेब दानवे यांना डावलण्यात खुद भाजप नेत्यांचाच हात असून दानवे शिवसेना संपवायला निघाले असल्याचा आरोप शिवसेना नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला.
याशिवाय दानवे यांच्यावर राज्यमंत्री खोतकर यांनी गंभीर आरोप केले असून, दानवे आणि त्यांच्या कुटुंबाने गुत्तेदारी आणि वाळूमधून मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.
दानवे शिवसेना संपवायला निघाले आहेत. जालना जिल्ह्यात शिवसेना संपवण्यासाठी ते काम करतात, तुम्ही त्यांना समज द्यायला पाहिजे, अशा स्वरुपाची मी संजय राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे, अशी माहितीही खोतकरांनी यावेळी दिली.
“दानवे यांना ‘मातोश्री’वर बोलवलं नाही. खुद्द भाजपच्या नेत्यांचाच दानवेंवर विश्वास नाही. दानवे गुप्तता पाळत नाहीत. ते त्या बैठकीच्या पात्रतेचे नाहीत म्हणून खुद्द पक्षांच्याच नेत्यांचा विश्वास नाही.”, असे खोतकर म्हणाले.
मला योग्य व्यासपीठ मिळाल्यावर त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडे तक्रार करणार असून, त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी इच्छाही खोतकरांनी व्यक्त केली. तसेच, दानवेंच्या तक्रारी घेऊन मी शासनाकडे जाणार, सगळं जनतेपुढे मांडणार, असेही ते म्हणाले.
VIDEO - काल एबीपी माझावरही दानवे आणि खोतकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली, त्या बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement