एक्स्प्लोर

राज्यपालांच्या नियुक्तीवरुन महायुतीत नाराजीनाट्य; भाजपकडून आमच्यावर सतत अन्याय झाल्याचा शिवसेनेच्या नेत्याचा रोष   

अमित शहा यांनी आनंदराव अडसूळ  यांना राज्यपाल करणार, असा शब्द दिला होता. मग या यादीमध्ये आनंदराव अडसूळ यांचे नाव का नाही? असा सवाल उपस्थित करत कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.  

Maharashtra Politics : अमित शहा अमित शहा (Amit Shah) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरून आम्ही दोन ते तीन वेळेस माघार घेतलीय, तरी राज्यपाल पद आनंदराव आडसूळ (Anandrao Adsul) यांना का नाही? अमित शहा यांनी आनंदराव अडसूळ  यांना राज्यपाल करणार, असा शब्द मार्च महिन्यात दिला होता. मग या यादीमध्ये आनंदराव अडसूळ यांचे नाव का नाही? असा सवाल उपस्थित करत महायुतीत भाजपकडून आमच्यावर अन्याय झाला असल्याची खंत कॅप्टन अभिजीत अडसूळ (Captain Abhijeet Adsul) यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

भाजपकडून प्रत्येक वेळी आमच्या शब्दाला केराची टोपली- अभिजीत अडसूळ

नुकतेच सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल (Maharashtra New Governor CP Radhakrishnan) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांच्याजागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते झारखंडचे (Jharkhand) राज्यपाल होते. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election) तयारी सुरु आहे. अशातच राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या नियुक्तीवरुन आता महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील (Shivsena) नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल पद का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित करत कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. 

प्रत्येक वेळी आम्ही बलिदान द्यायचं का?

मुख्यमंत्र्यांनी दोन वेळेस रेकमेंडेशन लेटर अमित शहा यांना पाठवलं होतं. मग दिलेला शब्द का पाळला गेला नाही? असा जर अन्याय आमच्यावर भाजपकडून होत असेल तर आम्हाला घरी बसल्याशिवाय पर्याय नसल्याचेही कॅप्टन अभिजीत अडसूळ म्हणाले. मुंबई बँकेचे अध्यक्षपद  प्रवीण दरेकर यांना मी माघार घेतल्यामुळे मिळालं. देवेंद्र फडणवीस यांनी मला माघार घ्यायला सांगितले होते, त्यानुसार  मी त्यांचा ऐकलं आणि माघार घेतली. असे असताना प्रत्येक वेळी आमच्या शब्दाला केराची टोपली भाजपकडून दाखवली जात आहे. प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसच्या खाली काम करतात. तरी त्यांचं सुद्धा ऐकले जात नाही. परिणामी, प्रत्येक वेळी आम्ही बलिदान द्यायचं का? त्यापेक्षा आम्ही घरी बसलेले बरं असल्याची नाराजी कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी बोलून दाखवली आहे.

माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय - अभिजीत अडसूळ

एकनाथ शिंदे यांनी जे भरभरून प्रेम दिले त्यांच्यामुळे आज प्रत्यक्ष शिवसैनिक त्यांच्यासोबत टिकून आहे. भाजप आणि सेना युती म्हणून आम्ही प्रत्येक वेळी हे सहन करायचं का? देवेंद्र फडणवीस एवढे जर प्रेम आमच्यावर करतात तर आम्हाला प्रत्येक वेळेस मागे का ठेवतात? या सर्व प्रकारामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अन्याय झाल्यासारखं वाटत असल्याची भावना  कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी बोलताना व्यक्त केली आहे. 

हे हे वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सNarhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरणUday Samant : मराठी भाषेला त्रास देणाऱ्यांना... उदय सामंतांचं भाषण Pune Vishwa Marathi SammelanGunaratna Sadavarte On Suresh Dhas भाजप नेत्यांनी सुरेश धसांना समज द्यावा, त्यांच्यावर हक्कभंग आणावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे
माझ्या पाठिशी भगवानगड आणि न्यायाचार्यांची ताकद उभी राहिलेय, माझा आत्मविश्वास वाढलाय: धनंजय मुंडे
Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Embed widget