एक्स्प्लोर

आनंदराव अडसूळ यांचं मानसिक संतुलन बिघडलंय त्यांनी चांगले उपचार करावे, खर्च मी करतो; रवी राणांची बोचरी टीका

Ravi Rana on Anandrao Adsul :माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचं मानसिक संतुलन सध्या बिघडलेलं आहे. त्यांनी चांगले उपचार घ्यावे, त्यासाठी लागणारा सर्व खर्च मी करतो. अशी टीका आमदार रवी राणांनी केलीय. 

Ravi Rana on Anandrao Adsul  अमरावतीराज्यपाल पदाच्या नियुक्तीवरुन महायुतीत चांगलीच खडाजंगी रंगली असताना आज पुन्हा शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार  आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. अशातच त्यांनी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana)  यांच्यावर निशाणा साधत नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत पुन्हा न्यायालयात आव्हान देण्याचा निर्धार केला आहे. या विषयी आता आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी पलटवार करत आनंदराव अडसूळ यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

वयाप्रमाणे आता त्यांना आराम करण्याची गरज- आमदार रवी राणा

माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांचं मानसिक संतुलन सध्या बिघडलेलं आहे. वयाप्रमाणे आता त्यांना आराम करण्याची गरज आहे. ज्या प्रमाणे आज ते आम्हाला  ब्लॅकमेल करत आहे, तसेच ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं नाव घेऊन ते ब्लॅकमेल करत आहेत. आज नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत विरोधात काम केलं अमरावती मध्ये येऊन त्यांनी महायुती विरोधात प्रचार केला. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी त्यांनी पूर्ण यंत्रणा कामाला लावली. किंबहुना त्यांनी अमित शहा यांना शब्द दिला होता की, आम्ही नवनीत राणांना विजयी करण्यासाठी काम करू. मात्र त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही आणि ते खोट बोलले. आज त्यांचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं असल्याची बोचरी टीका आमदार रवी राणा यांनी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचावर केलीय. 

उपचाराचा सर्व खर्च मी करतो - आमदार रवी राणा

राज्यपाल पद आणि इतर मागण्या करून त्यांनी स्वत: च मानसिक संतुलन बिघडलंय हे त्यांनी खऱ्याअर्थाने सिद्ध केलंय. त्यामुळे त्यांना आरामची गरज आहेच शिवाय चांगल्या डॉक्टर आणि चंगल्या उपचाराचीही गरज आहे. त्यांनी ते उपचार घ्यावे, त्यासाठी लागणारा सर्व खर्च मी करतो. आनंदराव अडसूळ यांनी काळजी स्वत:ची घ्यावी, असेही  आमदार रवी राणा म्हणाले. 

काय म्हणाले होते आनंदराव अडसूळ?

सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्राबाबत नवनीत राणांच्या  (Navneet Rana) बाजूने दिलेला निकाल समाजासाठी घातक आहे. या विरोधात येत्या काही दिवसात आपण पुन्हा न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिलीय. या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आम्ही अमरावती जिल्ह्यातील तिवसा, दर्यापूर, बडनेरा या तीन विधानसभेच्या जागा मागणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

इतर महत्वाच्या बातम्या   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलंKunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget