Whip: 'अधिवेशन संपेपर्यत आमदारांनी सभागृहात उपस्थित राहा', शिवसेनेकडून व्हिप जारी
शिवसेनेकडून (Shivsena) मंगळवारी (29 जून) आपल्या आमदारांसाठी तीन ओळींचा व्हिप (Whip) जारी करण्यात आला आहे.
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 व 6 जुलै 2021 असे दोनच दिवस घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आमदारांना अधिवेशन संपेपर्यत आमादारांनी सभागृहात उपस्थित राहवे, असा व्हिप आपल्या आमदारांना बजावला आहे.
शिवसेनेकडून मंगळवारी (29 जून) आपल्या आमदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, "राज्याचे पावसाळी अधिवेशन पाच आणि सहा जुलैला होत आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजुर करण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात आमदारांनी संपूर्ण दिवस उपस्थित रहावं असा पक्षादेश आहे". हा व्हिप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालय या पत्राद्वारे जारी करण्यात आला आहे.
व्हीप म्हणजे काय?
व्हीप म्हणजेच पक्षादेश. आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम व्हीपने करता येते. विधानसभेत एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर मतदान करायचे असेल किंवा विरोधात मतदान करायचे असेल तर त्याबाबतचा आदेश व्हीपमार्फत जारी करण्यात येतो. व्हीप हा पक्षांच्या आमदारांना बंधनकारक असतो. व्हीप हा राजकीय पक्षाचा अधिकार असतो. कार्यकारी विधिमंडळात पक्षातील शिस्त सुनिश्चित करणे हाच व्हीपचा हेतू असतो. एखाद्या पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक विचारसरणीनुसार निर्णय न घेता पक्षाच्या धोरणांनुसार मतदान करावे या हेतूने व्हीप काढला जातो. कोणत्याही आमदाराने हा आदेश धुडकावून पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान केले, तर त्या व्यक्तीचे सभासदत्व धोक्यात येऊ शकते अथवा तो अपात्र होण्याचा धोका असतो. त्याच्यावर पक्षशिस्तीची कारवाई तर होऊ शकतेच, शिवाय त्याला पदही गमवावं लागू शकतं. पक्षादेश (व्हीप) काढण्याचे अधिकार हे पक्षाने निवडलेल्या विधिमंडळ गटनेत्यालाच असतात.
संबंधित बातम्या :
पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा, भाजप शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले, राष्ट्रपतींना अहवाल पाठवण्याची मागणी
"भ्रष्टाचार आणि गोंधळ बाहेर येईल म्हणून अधिवेशनापासून पळ", देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका