BJP Vs Shivsena : 'गँगवार'चा सुरु असतानाच ठाकरे गट-भाजपमध्ये 'ट्विटर वॉर'; उखाळ्या पाखाळ्या काढण्याचा उद्योग शिगेला
उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असा दोन दिवसांचा दौरा केला. यानंतर त्यांनी वंदे भारतमधून हे प्रवास केला. आता वंदे भारतमधून प्रवास केल्यानंतर भाजपकडून खोचक शब्दात टिप्पणी करण्यात आली.

मुंबई : थेट मंत्रालयात जाऊन गावगुंडांनी रील करण्यापासून ते पार गृहमंत्र्यांच्या पक्षाच्या आमदारानेच मुख्यमंत्र्यांच्या नेत्यांवर गोळीबार करण्यापर्यंत राज्यात गँगवाॅर चांदा ते बादा माजला असतानाच आता शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये वंदे भारतमधील प्रवासावरून सुद्धा उकाळ्या पाखाळ्या काढण्याचा उद्योग सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण नेमकं चाललं आहे तरी कोणत्या दिशेनं? अशी प्रतिक्रिया वक्त होत व्यक्त होत आहे.
कोस्टल रोड, MTHL ही ठाकरेंची गॅरेंटी होती, पण क्रेडीट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटनाची घाई होतेय. MTHL अनेक महिने तयार असूनही उद्धाटनाला विलंब केला आणि आता कोस्टल रोड तयार नसूनही उद्धाटनाची घाई चाललीये.
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) February 6, 2024
पण तुम्ही कितीही घाई केलीत तरी मुंबईचे हाल करणाऱ्या खोके सरकारला… https://t.co/ix413cMg8X
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असा दोन दिवसांचा दौरा केला. यानंतर त्यांनी वंदे भारतमधून हे प्रवास केला. आता वंदे भारतमधून प्रवास केल्यानंतर भाजपकडून खोचक शब्दात टिप्पणी करण्यात आली. ठाकरे गटाकडूनही भाजपच्या ट्विटला खोचक प्रत्युत्तर देण्यात आले. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटरवर मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, वंदे भारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसरी बार मोदी सरकार अशी खोचक टिप्पणी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा फोटो शेअर करून देण्यात आली.
आयत्या प्रकल्पांवर उबाठा
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 6, 2024
घरात बसून बाबरी ढाच्या उध्वस्त केल्याचे श्रेय लाटल्या नंतर प्रस्तुत आहे "MTHL अटल सेतू" आणि कोस्टल रोड.
तुम्ही फक्तं आम्ही केलेल्या कामांची श्रेय लाटू शकता तुमच्या विकासाची गॅरंटी मातोश्री १ ते मातोश्री २ या पलीकडे नाही हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे.… https://t.co/cOg0zFeUD9
त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. कोस्टल रोड, एमटीएचएल ही ठाकरेंची गॅरेंट होती पण क्रेडिट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची घाई होते आणि एमटीएचएल अनेक महिने तयार असूनही उद्घाटनाला विलंब झाला आणि आता कोस्टर रोड तयार नसून उद्घाटनाची घाई चालली आहे, पण तुम्ही कितीही घाई केली तरी मुंबईचे हाल करणारे खोके सरकारला जनतेच्या मनात क्रेडिट मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया देण्यात आली.
हीच तर #ModiKiGuarantee
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 6, 2024
कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेन मधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं.
लवकरच बुलेट ट्रेन ची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण #ModiHaiToMumkinHai#विरोधक_देखील_लाभार्थी @ShivSenaUBT_ @OfficeofUT pic.twitter.com/KnznkvNU3d
या ट्विटवरही भाजपकडून प्रतिक्रिया देण्याता आली. आयत्या प्रकल्पांवर उबाठा. घरात बसून बाबरी ढाच्या उध्वस्त केल्याचे श्रेय लाटल्यानंतर प्रस्तुत आहे "MTHL अटल सेतू" आणि कोस्टल रोड. तुम्ही फक्तं आम्ही केलेल्या कामांची श्रेय लाटू शकता तुमच्या विकासाची गॅरंटी मातोश्री १ ते मातोश्री २ या पलीकडे नाही हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे.
तत्पूर्वी सुद्धा एक भाजपकडून ट्विट करण्यात आलं होतं त्यामध्ये हीच तर #ModiKiGuarantee कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेन मधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं. लवकरच बुलेट ट्रेनची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण #ModiHaiToMumkinHai
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

